लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न उधळवत दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

जम्मू : ९ जानेवारी – जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावून लष्कराच्या जवानांनी दोन सशस्त्र दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, अशी माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्यांनी रविवारी दिली.
‘बालाकोट भागातील सीमेवर कुंपणाजवळ तैनात भारतीय लष्कराच्या जवानांना शनिवारी सायंकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास संशयास्पद हालचाली आढळल्या आणि त्यांनी दोन
दहशतवाद्यांना ठार केले. परिसराला घेराव घालण्यात आला असून, व्यापक शोधमोहीम अजूनही सुरू आहे,’ असेही प्रवक्त्यांनी सांगितले. या दहशतवाद्यांकडून दोन एके रायफल आणि एक शक्तिशाली आयईडी यांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. या दहशतवाद्यांची ओळख आणि त्यांच्या संघटनेबाबत माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

Leave a Reply