तरीही निवडणूक आयोगावर आमचा विश्वास – संजय राऊत

मुंबई : ८ जानेवारी – शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत १२ जानेवारीला निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडणार आहे. यामुळे पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळणार की, एकनाथ शिंदेंना याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाच्या नेमणूका सरकार करतं. तरीही आयोगावर आमचा विश्वास आहे. आयोग ही स्वायत्त संस्था असून, निपक्षपातीपणे निर्णय घेतले जातील. आतापर्यंत हे स्वातंत्र आणि स्वायत्तता दिसली नाही. पण, तरीसुद्धा देशातील सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे. न्यायालयात रामशास्त्री बाण्याचे न्यायमूर्ती आहेत, असं संजय राऊत म्हटलं आहे.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, देशात संविधान न्याय आणि कायदा जिवंत आहे, असं मानतो. त्यामुळे केंद्राच्या राजकीय दबावापोटी महाराष्ट्रात बेकायदेशीर घडवलं आहे, हा डाव उधडळा जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली घटना आणि न्याय जिवंत आहे, याची देशाला खात्री होईल, असं संजय राऊतांनी सांगितलं.
“शिवसेना एकच असून एकच राहणार आहे. ६० वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. उद्धव ठाकरे नेतृत्व करत असलेल्या शिवसेनेबरोबर आम्ही सोबत आहोत. २० ते २५ लोक आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत, ते गेल्याने पक्षात फूट पडेल असं नाही. ते निवडून येणार नाहीत. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे,” असेही संजय राऊत यांनी म्हटलं.

Leave a Reply