वज्रादपि कठोराणी मृदुनी कुसुमादपी – धनंजय केशव केळकर

श्रीरामांचे हे वर्णन. बहुतेक भारतीय राजांना लागू होते. राज्यकारभार असाच चालवायला पाहिजे.
स्वातंत्र्यानंतर त्याची चुणूक स्वर्गस्थ गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे पाहायला मिळाली. पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा वचक असणारा. आणि अगदी सामान्यासाठी सहृदय असणारा हा नेता.
दरवेळी दोन सीट साठी महाराष्ट्रात भाजपला दुय्यम पदावर राहावे लागत असे. तेही एक गुपित. पण २०१४ला केंद्रात भाजपा सत्तेत आल्यावर, महाराष्ट्रातही सत्तेवर येणार हे स्पष्ट होत होते.
अशा वेळी जर गोपीनाथ मुंडे परत आले आणि मुख्यमंत्री झाले तर… या कल्पनेनेच अनेक गुंड मंडळींच्या पोटात गोळा उठला असेल.
त्या दोन हजार एनकाउंटर नंतर इतर राज्यकर्त्यांच्या काळात पोलिसांनाच खून करायला लावणे सुरु झाले. सरकारी गुंड. मनसुख हिरेनचे उदाहरण ताजेवाजे आहेच.
पूर्वी जसे आत्महत्या करणाऱ्यांच्या नातेवाईकांना वाचवण्यासाठी, चुकून झोपेच्या गोळ्या जास्त घेतल्या असे सांगितले जात असे तसे आजकाल खून करून आत्महत्या दाखवणे चालू झाले आहे.
याला मुंडे आळा घालतील अशी शंका येणे स्वाभाविकच आहे. दिल्लीचे ठग फार पूर्वीपासून प्रसिध्द आहेत. त्या नावाचे सिनेमेही आले आहेत. तेथे काहीही होऊ शकते.
बहुतेक नेते रात्रीचे दिल्लीत थांबत नसत. भाजपचे अध्यक्ष झाल्यावर गडकरींनी तसे स्पष्ट बोलून दाखवलेही होते. भाजपा सेनायुतीचे राज्य गेल्यावर म्हणजेच मुंडे गृहमंत्री नसताना पाच हजार रुपयात बिहारी गुंड मुंबईत येऊन खून करून त्याच गाडीने परतही जात असत.
मुंबईतील गुंड संपवले होते न. म्हणून हे बरे होते. दिल्लीत मोदी सरकार आल्यावर आता महाराष्ट्रातही गुंडाराज संपेल अशी आशा होती. पण तेच महाराष्ट्रातील गुंडांनाही लक्षात आलेच असणार ना.
मुंडेंचा मृत्यू झाला. तो घातपात होता आणि त्यांच्याच पक्षातील लोकांनी केला अशा वावड्या उठवून आपल्यावरील लक्ष उडवणे हा चोरांच्या उलट्या बोंबा प्रकार नवा नाही.
आजच माहिती कळली त्यांचा त्या वेळचा चालक आणि अपघात करणाऱ्या टॅक्सीचा चालक. दोघांनीही नंतर आत्महत्या केल्या.
आजकाल प्रत्येक माणसाची आत्महत्या ही खुनच वाटते. बहुतेक ते तसेच असते. म्हणूनच आपल्याला फक्त मृदुनी कुसुमादपी नेते लाभलेले दिसतात.

धनंजय केशव केळकर
गोरेगाव पूर्व, मुंबई.
9833410231 whatsapp

Leave a Reply