संशोधन आणि विकासासाठी अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध – मुख्यमंत्री

नागपूर : ३ जानेवारी – देशाच्या विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे संशोधन आणि विकासासाठी अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून, युवा पिढीने डॉक्टर आणि अभियांत्रिकीच्या पुढे जात संशोधक बनायला हवे, असा सल्ला राज्याचे मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी दिला. 108 व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. इंडियन सायन्स काँग्रेस या क्रायक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. यावेळी राज्यपाल भगत सींह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे जितेंद्र सिंह, आयएससीच्या ISC अध्यक्षा विजयालक्ष्मी सक्सेना, रातुम नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आदी उपस्थित होते.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, ‘अंधश्रद्धा निर्मूलनापासून ते सामाजिक विवेक जागृतीचे कार्य तुकडोजी महाराजांनी केले. त्यांच्या नावाने सन्मानित झालेल्या विद्यापीठात भारतीय विज्ञान कॉंग्रेस साजरी होत आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आता महिलांची भागिदारी वाढत आहे. कृषी विज्ञान, अवकाश, वैद्यक, पदार्थविज्ञान आदी क्षेत्रात अनेक महिलांनी लक्षणीय शोधकार्य केले असून, त्यामुळे येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळत आहे.’
भविष्यकालीन विज्ञान तंत्रज्ञान गरजेचे : नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले,’प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारत आणि पाच ट्रीलीयन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे ध्येय आपल्यासमोर ठेवले आहे. त्यासाठी कृषी आणि ग्रामिण अर्थव्यवस्थेवा महत्वपूर्ण भूमिका बजावेल. गाव, गरीब, कामगार यांच्या विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान गरजेचे आहे. यातून विकासाचे नवे आयाम साधायले जातील. स्थानिक स्तरावरील संशोधन, आर्थिक विकासाठी विज्ञान आवश्यक आहे. कृषी आणि ग्राम उद्योगासाठी भविष्यकालीन विज्ञान तंत्रज्ञान गरजेचे आहे.’
मोदींच्या नेतृत्त्वात विज्ञानात देशाची प्रगती : डॉ. जितेंद्र सिंग
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह,’देशातील जनमानसात योग्यता, क्षमता आणि कष्ट करण्याची ताकद आहे. फक्त कमी होती ती वातावरणाची. मोदींच्या नेतृत्वात ते निर्माण करण्यात आले आहे. आपली आजची सर्व आव्हाने ही वैश्विक आहेत. जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, सायबर सुरक्षा सारखे व हे जागतिक दर्जाची आहे. शाश्वत संशोधन, स्टार्टअप अनिवार्य आहे. संशोधन, शैक्षणिक संस्था आणि उद्योगांचे परस्पर सहकार्य गरजेचे आहे.’
गरजेनुसार संसाधने वापरा : देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘महिला सक्षमिकरण आणि लिंगसमानतेसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे. शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी विज्ञान महत्त्वाचे आहे. हवमान बदलामुळे कृषी क्षेत्राबरबोरच संपुर्ण मानवजातीसमोर मोठे संकट आहे. त्यामुळे शाश्वत विकासाचे धोरण अनिवार्य झाले आहे. मानवाने स्वतःच्या उपयोगासाठी गरजे एवढीच संसाधणे वापरायला हवी.’

Leave a Reply