भाजपशी युतीत आम्हाला शून्य जागा मिळाल्या तरी आम्हाला मान्य

जळगाव : ३ जानेवारी – भाजपचं लोकसभा मिशन , मिशनच्या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युती असणार आहे. युतीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील त्यात शून्य जागा जरी आम्हाला लढवावी लागल्या तरी तो मान्य राहील, असं शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
भाजपच्या लोकसभा मिशन बाबत शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.’भाजपाचे मिशन 145 आहे मात्र बाळासाहेबांची शिवसेना व भाजप आमची युती असणार आहेत. यात युतीचे नेत्यांनी जो निर्णय घेतला यात तो आम्हाला मान्य राहील. यामध्ये शून्य जागा जरी लढवायला लागल्या तो आम्हाला मान्य राहील फक्त शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश करावे’ असं गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजपच्या लोकसभा मिश वरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली होती. मात्र संजय राऊत यांच्या म्हणण्याला मी भाव देत नाही. कुणीतरी मागच्या दरवाज्याने येणाऱ्या माणसाने हे म्हणावं आणि त्याला आपण मान्यता द्यावी, अशी टीका देखील गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर केली.
बाळासाहेबांची शिवसेना गटाचे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाने एका केटरर्सला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यावर गुलाबराव पाटील याांनी प्रतिक्रिया दिली.
‘आपण एका जबाबदार व्यक्तीचे चिरंजीव असून असं करणं योग्य नाही आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती व या क्लिप मधून एका व्यक्तीला धमकी दिल्याचा दावा करण्यात आला होता मात्र खरच त्यांनी असं केलं असेल तर त्यांची समज देवू असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
‘पक्षातीलच काही आपल्याबाबत षडयंत्र रचत असल्याचा आरोप मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे गटात धुसफुस सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र मागच्या सरकारमध्ये धुसफुस नव्हती का? असा प्रश्न उपस्थित करत शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी अडीच वर्षात काँग्रेस राष्ट्रवादी आणि आमच्यात धुसफुस होती म्हणून तर गुवाहाटीला गेलो, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply