आदी शंकराचार्य हे जुलमी जातव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते – केरळमधील मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

नवी दिल्ली : ३ जानेवारी – केरळ सरकारमधील मंत्री आणि सीपीएम नेता एमबी राजेश यांनी आदी शंकराचार्यांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. आदी शंकराचार्य हे जुलमी जातव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते, असं ते म्हणाले. तिरुवनंतपूरममधील शिवगीरी मठ येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली
वृत्तानुसार, सोमवारी वर्कला शिवगीरी मठ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना एमबी राजेश यांनी आदी शंकरार्यांबद्दल वादग्रस्त विधान केलं. “केरळमध्ये कोणी आचार्य असेल तर ते श्री नारायण गुरू आहेत, आदी शंकराचार्य नाही. शंकराचार्य हे मनुस्मृतीवर आधारीत जुलमी जातव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते. मात्र, नारायण गुरू यांनी आयुष्यभर जाती व्यवस्थेविरोधात लढा दिला. तसेच नारायण गुरू यांनी जाती व्यवस्थेच समर्थन करणाऱ्या शंकराचार्यांवर टीका सुद्धा केली होती.”, असे ते म्हणाले.
दरम्यान, या विधानानंतर केंद्रीय राज्यमंत्री वी मुरलीधरन यांनी एमबी राजेश यांच्यावर टीका केली आहे. आदी शंकराचार्य आणि नारायण गुरुदेव दोघेही एकाच भारतीय वंशाचे असून अशी वादग्रस्त विधाने करून एमबी राजेश हिंदू धर्मात फूट पाडण्याचे काम करत आहेत, असे ते म्हणाले. तसेच सीपीएम केवळ राजकीय फायद्यासाठी आदी शंकराचार्य यांच्याबद्दल गैरसमज पसरवत आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

Leave a Reply