मंत्रालयामध्येच बोगस मुलाखतींचा अड्डा सुरु – अजित पवार यांचा खुलासा

नागपूर : ३० डिसेंबर – हिवाळी अधिवेशनामध्ये आज शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. मंत्रालयामध्ये बोगस मुलाखतीचा अड्डा सुरू असल्याचा खुलासा अजित पवारांनी केला. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिले आहे.
हिवाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. यावेळी मंत्रालयच बोगस मुलाखातीचा अड्डा बनला आहे. शिपाई लिपिकांचा भरती घोटाळा, बोगस मुलाखाती सामान्य प्रशासनाच्या उपसचिव कार्यालयात घेण्यात आल्याची माहिती अजित पवारांची सभागृहात दिली. त्यानंतर या प्रकरणावर कडक कारवाईचे देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिले आहे.
दरम्यान, त्याआधी लक्ष्यवेधीवरून अजित पवार चांगलेच संतापले होते. 5 नंबरची लक्ष्यवेधी पुढे ढकलून 6 नंबरची पुकारण्यात आली आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन हे सभागृहात गैरहजर असल्यामुळे ही लक्ष्यवेधी पुढे ढकलली होती. पाच नंबरची लक्ष्यवेधी पुढे का ढकलली, मंत्र्याला इथं राहणे गरजेचं होतं. आम्ही सुद्धा मंत्री होतो, आम्ही काय इथे एकदम येऊन बसलो नाहीये. मंत्र्याचं काम असतं, आमचं चुकलं तर आम्हाला समज द्या, त्यांचं चुकलं तर त्यावर पांघरून घालू नका, त्यालाही समज द्याल, पुढच्या अधिवेशनात कोण राहणार कोण नाही, काय माहिती, सगळ्यांचे लाड सुरू आहे, अशा शब्दांत अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
दरम्यान, राज्यात तब्बल 25 लाख 30 हजार 218 विद्यार्थ्याचे आधार कार्ड अवैध असल्याची बाब उघड झाले आहे. आमदार मनिषा कायंदे यांनी विधान परिषदे विचारलेल्या लेखी प्रश्नाला शिक्षण विभागाचं लेखी उत्तर दिले आहे. विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड अपडेट नसल्यास योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. सरकारकडून डिसेंबर अखेर पर्यंतची आधार अपडेटसाठी वेळ मागितली होती. उद्या मुदत संपल्यावर आता आधार अपडेट नसलेल्या मुलांचं पुढं काय हा प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहे.

Leave a Reply