सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले फैलावर

नागपूर : २७ डिसेंबर – आज विधान भवनमधील भोजन व्यवस्थेबाबत दिरंगाई करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज चांगलेच फैलावर घेतले. झालेल्या दिरांगाईबाबत या शासकीय अधिकाऱ्यांना लेखी स्पष्टीकरण देण्याबाबत यावेळी सांगण्यात आले.
आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबत तक्रार केली होती. त्याबाबत आज डॉ. गोऱ्हे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार अमोल मिटकरी, विधान परिषद सचिव राजेश तारवी, ऋतुराज कुरतडकर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार निवासात आमदारांसाठी असलेल्या भोजन कक्षातील जागा आणि गुणवत्तेसह व्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात यावी असेही यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

Leave a Reply