रोटरी क्लब नागपूर ब्लॅक गोल्ड चा अभिनव आणि ऊपयुक्त ऊपक्रम

नागपूर : २६ डिसेंबर – निसर्गत:एका विशिष्ट वयात पाळी येणे ही जगातील सर्वच स्त्रियांना लाभलेली देणगी आहे.सहावीत असणार्‍या विद्यार्थिनीपासुन ही प्रक्रिया प्रारंभ होते.बर्‍याच मुलींना त्रासही होतो पण संकोचामुळे मुली गडबडीत वापरलेले पॅड कुठेही फेकून देतात व पुढे यातूनच वेगळा घटनाक्रम समोर येतो.या वापरलेल्या पॅडला अतिशय दुर्गंध असतो व ऊघड्यावरअसल्यानेवातावरणात पसरतो ज्यामुळे कॅन्सर नावाचा दुर्धररोग सध्या बळावत आहे.वैद्यकीय शास्त्र व सरकार यावर ऊपाययोजना करीतच आहे परंतु भारताची अफाट लोकसंख्या बघता रोटरीक्लब ब्लॅक गोल्डने पुढाकार घेवून शारदा महिला विद्यालयात पॅड जाळण्याची मशीन लावून एक पावूल टाकले आहे.विशेष म्हणजे या मशिनचे डिझाईनही नागपूरचे नरेंद्र माथूरकर ह्यांनी केलेले आहे.
रोटरी क्लब ब्लॅक गोल्ड च्या निरिक्षणात वापरलेले पॅड अस्ताव्यस्त अवस्थेत पसरलेले आढळले .एका नव्या जोमाने क्लबने समाजाला निधीसाठी आवाहन केले व या मशीन लावण्यात आली.ही मशीन लावल्याने क्लबला आत्मिक समाधान आहे.देशाचे नागरिक स्वस्थ असावे हीच ईच्छा
भविष्यात यावरील जागरण म्हणजे तरूण पीढीतीलच युवक युवतीच्या मार्फत समाजाचे प्रबोधन करणे असे ऊपक्रम राबवून भारताचे भविष्य समृद्ध करण्याचा क्लबचा मानस आहे.विशेषत:महिला देशात अग्रसर असाव्यात हा ऊद्देश डोळ्या समक्ष ठेवून कार्य पुढे चालत आहे.
रो.शीला ढोमणे
रोटरी क्लब नागपूर ब्लॅक गोल्ड.

Leave a Reply