राहुल शेवाळेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून केली मनीषा कायंदे यांची तक्रार

मुंबई : २३ डिसेंबर – शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांच्याविरोधात एक तक्रार केलीये. यासंदर्भातलं पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं. एका ज्येष्ठ नेत्यासोबत २००७ साली लग्न करुनही २०११ साली लैंगिक शोषणाचा आरोप केला आणि संबंधित नेत्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोप खासदार शेवाळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे. सोबतच घर, वडिलांचा दवाखाना आणि दुकानांचं फर्निचर कायंदे यांनी ज्येष्ठ नेत्याकडून करुन घेतल्याचा आरोप शेवाळे यांनी केला. या पूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी शेवाळे यांनी गृहमंत्री फडणवीसांकडे केली आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत करताच विधानपरिषदेत त्याचे पडसाद उमटले. शिवसेना (ठाकरे गट) आमदा मनिषा कायंदे यांच्या मागणीवरून उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मुंबईतील शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या बलात्काराच्या आरोपांची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे केली जावी, असे निर्देश दिले. आदित्य ठाकरेंवर आरोप झाल्यानंतर मनिषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांचीही बलात्काराच्या आरोपांची चौकशी व्हावी, अशी मागणी करुन विधानपरिषद दणाणून सोडली. ज्यानंतर उपसभापती निलम गोऱ्हे SIT चौकशीचे निर्देश दिले.
मनिषा कायंदे यांनी ज्येष्ठ नेत्याला धमकी देण्यासाठी गुंडांच्या टोळीचा वापर केला. एका ज्येष्ठ नेत्यासोबत २००७ साली लग्न करुनही २०११ साली लैंगिक शोषणाचा आरोप केला आणि संबंधित नेत्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोप खासदार शेवाळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे. सोबतच घर, वडिलांचा दवाखाना आणि दुकानांचं फर्निचर कायंदे यांनी ज्येष्ठ नेत्याकडून करुन घेतल्याचा आरोप शेवाळे यांनी केला.
मनिषा कायंदे यांच्यासंबंधित आरोप केलेलं प्रकरण २०१० सालचं आहे म्हणजेच या घटनेला १२ वर्ष उलटून गेली आहेत. आता शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रानंतर कायंदेंची चौकशी लागते का? राज्य सरकार त्यासंबंधी काही पाऊल उचलणार का? हे पाहणे महत्त्वाचं आहे.

Leave a Reply