शिधा खराब होण्यापूर्वी वाटप करा : डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर : २३ डिसेंबर – राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिवाळी सणानिमित्त फूड किट वाटप करण्यात आले मात्र अजूनही अनेक ठिकाणी वितरित झालेल्या नाहीत. सदरचा शिधा गोडावून मध्ये खराब होण्यापूर्वी त्याचे लवकरात लवकर वाटप करावे अशा सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
राज्य सरकारतर्फे दिवाळीत आनंदाचा शिधा म्हणून ‘दिवाळी फूड किट’ चे वाटप केले. या संदर्भातली निविदा प्रक्रिया आणि सदोष वितरण, याकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, डॉ. मनीषा कायंदे आणि ऍड. अनिल परब यांनी शुक्रवारी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री रविंद्र चव्हाण यांनी उत्तर दिले परंतु सदस्यांचे या उत्तरावर समाधान झाले नाही त्यावर
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सरकारला निर्देश दिले की, शिधा वाटपातील त्रुटी दूर कराव्या आणि शिधा किट खराब होण्यापूर्वी त्याचे वितरण करावे.

Leave a Reply