संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या – आ प्रवीण दटके

नागपूर : २२ डिसेंबर – यावर्षी विदर्भात 1 लाख 70 हजार हेक्टर वर संत्री-मोसंबीची लागवड करण्यात आली. परंतु यावर्षी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विदर्भातील संत्री पिकावर त्याचा विपरीत परिणाम दिसून आला.
या दरम्यान संत्री कोळशि या रोगामुळे काळी पडू लागल्याने व अतिवृष्टीमुळे संत्री उत्पादनात घट झाली.
रोगामुळे काळी पडलेली तसेच अतिवृष्टीमुळे नासाडी झालेल्या संत्रामुळे शेतकरी तसे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले . त्यामुके अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या संत्रा बागांचे पुनश्च सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी आमदार प्रवीण दटके यांनी विधान परिषदेमध्ये केली .
यावेळी उत्तर देत असताना मा मंत्री उदय सामंत यांनी दुबार सर्वेक्षण करणार असल्याचे सभागृहाला आश्वासित केले

Leave a Reply