रश्मी शुक्ला प्रकरणात विरोधकांनी मागितला उप मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

नागपूर : २२ डिसेंबर -फोन टॅपिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या पुण्याचे माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या बाबतीत विधानसभेत चर्चे मागणी केली असता अध्यक्षांनी प्रकरण न्यायालयात असल्याचे सांगत चर्चा टाळली. हे प्रकरण आमदरांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. त्यामुळे यावर चर्चा होणे महत्त्वाचे होते. तसेच दोष सिद्ध झाल्यावरही शुक्ला यांना क्लिन चिट देणाऱ्या सरकारचा निषेध व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करीत अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याचा इशारा कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी आज विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केला. नाना पटोले नियमाचा दाखला दिला तरी अध्यक्षानी चर्चा टाळली हे चुकीचे आहे असे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply