संपादकीय संवाद – नाना पटोले यांची अमृता फडणवीसांवरील टिप्पणी अनाठायी

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस या बरेचदा आपल्या विधानांमुळे वादग्रस्त ठरत असतात, काल त्यांनी महात्मा गांधी हे जुने राष्ट्रपिता होते तर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवे राष्ट्रपिता आहेत, असे वक्तव्य माध्यमांशी बोलतांना केले, त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या सवयीनुसार अमृता फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
अर्थात नाना पटोले यांना महाराष्टातील जनता तर राहू द्या पण काँग्रेस कार्यकर्तेही फारसे गांभीर्याने घेत नसावेत, त्यामुळे नानाच्या या टीकेचे काही विशेष नाही. मात्र इतर गांधी प्रेमींनी जी काही टीका केली आहे, ती बघता या विषयावर भाष्य करणे पंचानामाला गरजेचे वाटते. त्यामुळेच आज हे संपादकीय आम्ही वाचकांसाठी देत आहोत.
महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी तत्कालीन जनतेने उत्स्फूर्तपणे दिली होती, सर्वसाधारणपणे शासकीय किंवा सामाजिक स्तरावर जर काही पदव्या किंवा सन्मान दिले जाणार असले तर त्यासाठी काही नियम ठरलेले असतात. मात्र जेव्हा जनतेकडून उत्स्फूर्तपणे एखादी पदवी दिली जाते, तेव्हा जनतेला त्या व्यक्तीबाबत वाटणारे प्रेम जिव्हाळा आणि आदर त्या पडवीतून व्यक्त होत असतो. ज्यांना ते पटते तेच त्या पद्विवच वापर करतात, बाकी लोक अश्या पदवीचे उपयोग टाळतात. याचे अधिक सविस्तर उदाहरण द्यायचे झाल्यास , १९२४-२५ च्या दरम्यान नाशिक जिल्ह्यातील काही उत्साही मंडळींनी आणि नंतर १९३५-३६ च्या दरम्यान, रत्नागिरी येथील नागरिकांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्वातंत्र्यवीर आणि हिंदुहृदयसम्राट हे सन्मान प्रदान केले होते. नंतरच्या काळात साधारणतः १९९० च्या दरम्यान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही त्यांच्या चाहत्यांनी हिंदुहृदयसम्राट या सन्मानाने गौरवले. यामुळे सावरकरांचा सन्मान कुठेही कमी झाला नाही तर बाळासाहेबांच्या सन्मानही कुठेही धक्का पोहोचला नाही, दोघांनाही त्यांचे चाहते सारखाच सन्मान देत आहेत त्यातील कित्येक जण हे सावरकर आणि ठाकरे दोघांचेही चाहते आहेत हे विशेष.
जो प्रकार हिंदुहृदयसम्राट या पदवीबाबत आहेत तोच प्रकार लोकनायक या सन्मानाबाबतही आहे, स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रणी ज्येष्ठ काँग्रेसी नेते आणि बिहारचे माजी राज्यपाल बापूजी अणे यांना त्यांच्या चाहत्यांनी कुण्या एका काळात लोकनायक या सन्मानाने गौरवले होते, नंतर १९७५ च्या आणीबाणीत सक्रिय भूमिका बजावणारे सर्वोदयी नेते जयप्रकाश नारायण यांनाही जनतेने लोकनायक या सन्मानाने गौरवले. असे अनेक किस्से सांगता येतील.
देशात लोकशाही आहे, प्रत्येकाला विचार स्वत्र्यानंतर आहे त्यानुसार प्रत्येकाला आपला आदर्श आपला हिरो आपले रोल मॉडेल ठरवण्याचाही अधिकार आहे. एखाद्याला छत्रपती शिवाजी महाराज हेच संपूर्ण जगातील तरुणाईचे आदर्श वाटू शकतात तर काहींना डॉ. आंबेडकर हेदेखील वाटू शकतात तर काहींना सुनील गावस्कर किंवा सचिन तेंडुलकर हे देखील वाटू शकतात. त्यामुळे एखाद्याने एखाद्याला आपल्याआवडीनुसार सन्मानजनक पदवीने उल्लेखित केले तर इतरांना मिरच्या झोंबण्याची गरज नाही. मोहनदास करमचंद गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात जे योगदान दिले त्यामुळे तत्कालीन नागरिकांनी त्यातही त्यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांना राष्ट्रपिता या सन्मानाने गौरवले होते. याचा अर्थ सर्वानाच हा सन्मान मान्य होता असे नाही त्या काळातही त्याला विरोध करणारे काही असतीलच नव्हे होतेच. ज्या प्रमाणे महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले त्याचप्रमाणे २०१४ नंतर नरेंद्र दामोदरदास मोदी या व्यक्तीने नवा भारत घडवण्यासाठी मोलाचे योगदान असे त्यांच्या हजारो चाहत्यांना वाटू शकते. नव्हे वाटतेही. हे फक्त पंचनामाचेच मत आहे असे नाही तर २०१९ च्या निवडणुकीत मतदारांनीही यावर शिक्कामोर्तब केले आहे. अश्या परिस्थितीत अमृदा देवेंद्र फडणवीस नामक एखाद्या सुविद्य महिलेला नरेंद्र मोदींना राष्ट्रपिता म्हणून गौरविण्याची इच्छा झाली तर तो लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे. तो नाना पटोले किंवा फडणवीसांचे कुणीही विरोधक हा अधिकार नाकारू शकत नाही. असे असले तरी विरोधासाठी विरोध करणे ही आमच्या राजकारण्यांची विशेषतः आहे त्यात कोणताही मुद्दा असो किंवा नसो विरोध केलाच पाहिजे असे त्यांचे मत आहे. म्हणूनच नानाची ही पोपटपंची सुरु आहे. मात्र या राज्यातील जनता शहाणी आहे, याची जाणीव नानांनी ठेवावी आणि असा निरर्थक विरोध करणे थांबवावे इतकेच सुचवावेसे वाटते. या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंनी अमृता फडणवीस यांच्यावर केलेली टीका अनाठायी आणि आकसपूर्ण आहे हे निश्चित.

अविनाश पाठक

Leave a Reply