मुस्लिमांच्या ५ टक्के आरक्षणासाठी अबू आझमी फलक घेऊन उतरले विधानभवनाच्या पायऱ्यांवर

नागपूर : २१ डिसेंबर – काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता असताना मुस्लिमांना शिक्षण व नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला होता. नंतरच्या सरकारने मात्र त्यावर अमल केला नाही. परंतु समाजवादी पार्टी सातत्याने या आरक्षणासाठी आंदोलन, मोर्च काढत आली आली आहे. वेगवेगळ्या समित्यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याची शिफारस केली आहे.
आता शिंदे मुख्यमंत्री असून सर्व वर्गाला न्याच देण्याची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे मुस्लिमांना आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी केली. आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी विधान भवनाच्या पायरीवर फलक घेऊन निदर्शने केली.

Leave a Reply