अनिल देशमुख यांच्या जमीन अर्जावर उद्या पुन्हा उच्च न्यायालयात होणार सुनावणी

मुंबई : २० डिसेंबर – माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर उद्या पुन्हा हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मात्र, त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना हायकोर्टाने दिलासा दिलाय. मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने संदीव पालांडे यांना जामीन मंजूर केलाय. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी दोन लाख रूपयांच्या जात मुचलक्यावर पालांडे यांना जामीन मंजूर केलाय.
मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना 12 डिसेंबर रोजी जामीन मंजूर केला आहे. परंतु, सीबीआयच्या विरोधानंतर न्यायालयाने दहा दिवसांसाठी म्हणजे 22 डिसेंबरपर्यंतल जामीनाला स्थगिती दिली होती. ही स्थगिती वाढवण्यासाठी सीबीआयने हायकोर्टात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात यंदा सुट्टीकालीन कोर्ट उपलब्ध नसल्यामुळे 3 जानेवारीपर्यंत स्थगिती वाढवण्याची सीबीआयकडून विनंती करणार आहे. आज दुपारी अडीच वाजता न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यापुढे सीबीआयने आपला अर्ज तातडीच्या सुनावणीसाठी सादर केला. मात्र यावर अद्याप सुनावणी झालेली नाही.
जामीन अर्जावर निकाल दिल्यानंतर 10 दिवसांच्या आत ही सुनावणी झाली नाही तर अनील देशमुखांचा जामीन लागू होऊन त्यांची कारागृहातून सुटका होईल.
ईडीने 25 जून 2022 रोजी मनी लॉण्ड्रिंग प्रकरणाच्या तपासासाठी अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरावर छापा टाकून झाडाझडती केली होती. PMLA कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील जीपीओ चौक परिसरातील निवासस्थानी तसंच त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानी देखील त्यावेळी छापेमारी करण्यात आली होती. या छापेमारीनंतर संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली होती.

Leave a Reply