विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली

नागपुर : १९ डिसेंबर – विधानपरिषदेत आज दिवंगत माजी सदस्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. पावसाळी अधिवेशनानंतर मृत्यू झालेले माजी आमदार सुरेश पाटील, प्रभाकर संत आणि शांताराम अहेर यांना शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पीठासीन सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हा शोकप्रस्ताव मांडला यावेळी त्यांनी या तीनही दिवंगत सदस्यांचा जीवनपट उलगडत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. नंतर त्यांनी शोकप्रस्ताव मांडल्यावर सभागृहाने दोन मिनिट मौन पाळून दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Reply