१२ वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

भोपाळ : १८ डिसेंबर – स्कूलबसमधून घरी जाताना एका १२ वर्षीय मुलाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये उघडकीस आली आहे. मनीष जाटव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. शुक्रवारी (१६ डिसेंबर) रोजी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली.
मनीष चौथ्या वर्गात शिकत असून शुक्रवारी दुपारी त्याने शाळेत आपल्या भावाबरोबर जेवण केले. त्यानंतर तो स्कूलबसमध्ये बसून घरी जाण्यासाठी निघाला. मात्र, घरी पोहचण्यापूर्वीच त्याची तब्बेत बिघडल्याने स्कूलबस चालकाने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ”आम्ही मनीषला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला वाचवू शकलो नाही”, अशी प्रतिक्रिया जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. अनिल गोयल यांनी दिली.
दरम्यान, मनीषच्या कुटुबियांनी शवविच्छेदन करण्यासाठी नकार दिल्याने मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आला. तसेच मनीषला आरोग्याबाबत कोणतीही समस्या नव्हती, अशी माहिती मनीषच्या वडिलांनी दिली.

Leave a Reply