जुन्या चावीने दुचाकी चोरणाऱ्या टोळीस अटक, १४ दुचाकीही जप्त

नागपूर : २३ मे – चावी जुनी असली तरी ती कुठेही कामास पडते. अगदी हाच फंडा वापरत एका गुन्हेगारांच्या टोळीने चक्क जुन्या चाव्यांनी नवीन दुचाकी चोरल्या. याच टोळीला अटक करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी केली. याप्रकरणात पोलिसांनी १४ दुचाकी चोरींचाही पर्दाफाश केला आहे.
अविनाश प्रभाकर उघडे, चरण रामदास निमावत अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याशिवाय एका अल्पवयीन आरोपीचाही यात समावेश आहे. विशेष म्हणजे जो अल्पवयीन आहे, तोच यातील मास्टरमाईंड आहे. त्यानेच जुन्या चाव्यांचा वापर करून सातत्याने नागपूर शहराच्या हद्दीतून अनेक दुचाकी गाड्या चोरल्या. अल्पवयीन आरोपी दुचाकी चोरल्यानंतर त्याचा साथीदार अविनाश उघडे व चरण निमावतला द्यायचा. ते पुढे त्या दुचाकीची विल्हेवाट लावायचे. नागपुरातील वाहनाचे क‘मांक बदलवायचे, काही जुजबी बदल करून दुचाकी चोरीची नाही, असा संशय येणार नाही याची काळजी घेत तिला विकून टाकायचे, असाही गोरखधंदा या टोळीने केला. सुमारे 14 दुचाकी चोरीस गेल्यानंतर पोलिसांनाही या चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे झाले होते. ते त्यांनी पेलत आरोपींना गजाआड केले. आरोपींकडून 14 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply