गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल घेणार मुख्यामंत्रीपदाची शपथ

नवी दिल्ली : ८ डिसेंबर – गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे. पण मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत विविध नावं चर्चेत होती.
पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून विद्यमान मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल हेच मुख्यमंत्रीपदाची पुन्हा शपथ घेणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी ही घोषणा केली आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. भाजपनं या निवडणुकीत रेकॉर्डब्रेक जागा जिंकल्या आहेत.
भूपेंद्र पटेल हे दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पहिल्यांदा त्यांची भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी १२ सप्टेंबर २०२१ रोजी निवड झाली होती. निकालामध्ये भाजप स्पष्ट बहुमत मिळवत असल्याचे कल दिसत असल्यानं सी आर पाटील यांनी भूपेंद्र पटेल यांना घेऊन पत्रकार परिषद घेतली. यामध्ये पटेल हेच मुख्यममंत्रीपदाची शपथ घेतील असं जाहीर केलं. भाजप राज्यात सातव्यांदा सरकार स्थापन करणार आहे.

Leave a Reply