अकोला : ७ डिसेंबर – जावयाची हत्या करुन आत्महत्येचा बनाव करणाऱ्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील मनारखेड येथे पाच तारखेला ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. जावई रवी राजगुरे याने स्वतःच्या डोक्यात वार करुन आत्महत्या केल्याचा कांगावा सासुरवाडीच्या माणसांनी केला होता. मात्र पोलीस तपासात त्यांचं बिंग उघड झालं.
अकोला जिल्ह्यातल्या मनारखेड इथे ५ डिसेंबरला एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह बाळापुर शहरातल्या रवी राजगुरे व्यक्तीचा असल्याचा समजलं. त्याच्या सासरच्या घरासमोर हा मृतदेह पडून होता.
पोलिसांना या संदर्भात सासरच्यांनी माहिती दिली, अन सांगितले की रवीने स्वतः डोक्यात वार करून स्वतःला मारून घेतले. त्यानंतर या प्रकरणात आकस्मित मृत्यूची नोंद झाली. तपासा दरम्यान सासरच्या लोकांनी रवीची हत्या केली असल्याचं समोर आलंय. सद्यस्थितीत या प्रकरणात तीन लोकांवर गुन्हे दाखल झाले असून एकाला अटक करण्यात आली आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापुर शहरातील नवानगर भागातील व्यक्ती सासरवाडी मनारखेड इथे मृतावस्थेत आढळला. या प्रकरणी बाळापूर तालुक्यात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या होत्या, ही आत्महत्या की खून, असा प्रश्न निर्माण झालाय.
रवी सुरेश राजगुरे (वय ४०) हा ५ डिसेंबर रोजी सासरवाडी मनारखेड इथे गेला होता. दरम्यान सायंकाळी तो मृतावस्थेत आढळून आला. तेव्हा या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला होता. याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून, आत्महत्या की खून, हा प्रश्न कायम होता.
दरम्यान, शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात या प्रकरणाचा उलगडा झाला. त्यानंतर या प्रकरणात हत्येच्या दिशेने तपास सुरू झाला. रवी सुरेश राजगुरे (४०) याच्या मृत संदर्भात हत्याचा गुन्हा दाखल झाला. मृतकाचा चुलत भाऊ योगेश राजगुरे यांच्या फिर्यादीवरून मृतक रवीचा मेहुणा, मेहुणी, सासू आणि सासऱ्यांनी जड अवजारने डोक्यात वार करून खून केला. अशा फिर्यादीवरून व घटनास्थळाच्या पंचनाम्यावरून ही घटना हत्येचा संशय आल्याने पोलिसांनी आरोपी मृतकाची सासू रमाबाई सुरोशे, मृतकाचा मेहुणा जानराव वाहूरवाघ, मेहुणी शारदा जानराव वाहूरवाघ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून जानराव वाहूरवाघ याला ताब्यात घेतले.
मयत रवी आणि त्याच्या पत्नीत सतत वाद व्हायचा, या वादातून पत्नी रागाच्या भरात घर सोडून गेली. पत्नीच्या शोधात तो सासर मनारखेड इथे गेला. पत्नीच्या संदर्भात सासरच्यांना त्याने विचारणा केली. यावेळी सासरच्यांनी पत्नी संदर्भात माहिती द्यायला नकार दिला. आणि तुमच्या दोघात सतत भांडण व्हायचं अन् तू तिला का मारहाण करतो, असं विचारत वाद घातला. या वादातूनच सासरच्या लोकांनी जड अवजाराने डोक्यात वार करून त्याला गंभीर जखमी केले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.