भर रस्त्यात स्वतःचाच गळा चिरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद : ६ डिसेंबर – औरंगाबादमधून एक धक्कादायक आणि मनविचलित करणारी घटना समोर आली आहे. एका तरुणाने भर रस्त्यावर उभं राहुन स्वत:चाच गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी या तरुणाला रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक क्षेत्रात हा प्रकार घडला आहे. भर रस्त्यात काचेच्या तुकडा घेऊन एक तरुण उभा होता. बराच वेळ तो उभा होता त्यानंतर जोरजोरात आरडाओरडा करायला लागला. मला जगायचं नाही, मला मदत करू नका, असं म्हणत या तरुणाने स्वतःचाच गळा कापला.
एकापाठोपाठ 9 ते 10 वेळा त्याने मानेवर काचेच्या तुकड्याने वार केले. हा सगळा प्रकार तिथेच बाजूला उपस्थितीत असलेल्या काही तरुणांनी मोबाईलमध्ये कैद केला. काही जणांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली.
घटनास्थळी पोलिसांच्या दामिनी पथकाने धाव घेतली आणि या तरुणाला ताब्यात घेतलं, त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. दामिनी पथकाने रक्तबंबाळ अवस्थेत या तरुणाला उपचारासाठी दाखल केले आहे. हा तरुण गुजरात इथं राहणार आहे. आत्महत्या करण्याच्या तयारीत असणारा हा तरुण वेडसर असल्याच चौकशीत समोर आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Leave a Reply