महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द

मुंबई : ५ डिसेंबर – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांचा कर्नाटकात समावेश करण्याची तयारी दर्शवली होती. मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तव्य महाराष्ट्र कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा तापला. यानंतरही कर्नाटक सरकारडून महाराष्ट्रातील सीमाभागातील गावांना पाणी सोडण्यात आल्याने आणि आक्रमक वक्तव्य करण्यात आल्याने तणावात भर पडली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे उद्या सीमा भागात जाऊन मराठी बांधवांची भेट घेणार होते. पण आता त्यांचा हा दौरा तूर्त रद्द करण्यात आला असून तो लांबवणीवर टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दोन्ही राज्यांमध्ये भाजपचेच सरकार असल्याने महाराष्ट्रातील नेतृत्वाकडून टोकाची भूमिका घेतली जात नसल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावाद वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणारे आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे सीमावादावर अमित शहांशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यासोबतच सीमावाद चिघळू नये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून मंत्र्यांना तूर्त दौऱ्यावर न जाण्याच्या सूचना दिल्याचं सांगण्यात येत आहे. सीमाभागातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मुख्यमंत्री शिंदे हे पुढील रणनीती आखणार असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर कर्नाटकला जशास ते उत्तर देण्याची तयारी महाराष्ट्राने केली होती. महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने सीमा प्रश्नावर समन्वय साधण्यासाठी मंत्र्यांची समिनी नेमलीय. या समितीत चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई आहेत. हे दोन्ही मंत्री उद्या बेळगावच्या दौऱ्यावर जाणार होते. याबाबत गेल्या आठवड्यात त्यांनी जाहीर केलं होतं. पण मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सीमा भागात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा दौरा रद्द करावा, असं आवाहन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. तसंच कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना मंत्र्यांचा दौरा रद्द करण्याची मागणी केली होती.

Leave a Reply