26 डिसेंबरला किसान सभेचा नागपूर विधिमंडळावर भव्य मोर्चा

नागपूर : ४ डिसेंबर – शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नावरुन महाराष्ट्रराज्य किसान सभा चांगलीच आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांसह शेतमजुरांच्या विविध मागण्यासंदर्भात मैदानात उतरण्याचा इशारा किसान सभेच्या वतीनं देण्यात आला आहे. येत्या 26 डिसेंबरला नागपूर विधिमंडळावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकरी आणि शेतमजुरांनी सहभागी व्हावं असं आवाहन राज्य किसान सभेच्या वतीनं करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती किसान सभेचे नेते राजन क्षीरसागर यांनी दिली आहे.
डिसेंबर महिन्यात राज्य विविधमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणार आहे. या अधिवेशादरम्यान मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राजन श्रीरसागर यांनी दिली. दरम्यान, वणी ते नागपूर अशी पदयात्रा करीत शेतकऱ्यांची संघर्ष दिंडी काढण्यात येणार आहे. शेतकरी आणि शेतमजुरांचा थेट नागपूर विधींडलावर मोर्चा नेणार असल्याचे किसान सभेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. यासंबंधीचे एक पोस्टर देखील त्यांनी प्रकाशीत केलं आहे.
यावर्षी राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीनं थैमान घातलं होतं. याच शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची हातात आलेली उभी पीकं वाया गेली आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका मराठवाडा आणि विदर्भाला बसला आहे. काही ठिकाणी पीक वाया गेली आहेत, तर काही ठिकाणी जमिनीही खरवडून गेल्या आहेत. दुसरीकडं अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांवर रोगराईचा परिणाम झाला आहे. त्यामुळं उत्पादनात मोठी घट आली आहे. अशातच बँकांकडून शेतकऱ्यांनी कर्ज काढलं आहे. आता हे कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यामुळं शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत.

Leave a Reply