जयसिंग चव्हाण यांना दिव्यांगाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

नागपूर : ३० नोव्हेंबर – सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्लीतर्फे दिला जाणारा सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षी 2022 चा पुरस्कार राज्यातील दिव्यांग उद्योगपती आणि समाजसेवक जयसिंग कृष्णरावजी चव्हाण यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा तीन डिसेंबर २०२२ रोजी नवी दिल्ली येथे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कारात दोन लाख रुपयाची धनराशी, मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यामुळे राज्याच्या गौरवात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
जयसिंग कृष्णरावजी चव्हाण या ८७% टक्के दिव्यांग तरुण व्यक्तींनी शिक्षण नसतानाही स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्याचे स्वप्न पाहिले. जिद्द, चिकाटी कष्ट करण्याची तयारी उराशी बाळगून योग्य नियोजन केले. सन १९९९ साली आपल्या उद्योगाची सुरवात केली. आज ते रंजना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज प्रा. लि. या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहे. त्यांना समाजकार्याची आवड असून विविध उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांगाना मदत करण्यासाठी तत्पर असतात. महानगर पालिकेने दिव्यांगाना जागा देऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी जागा द्यावी यासाठीही ते प्रयत्न करीत आहेत. सध्या ते भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश संयोजक आहेत. ते यशाचे श्रेय आई रंजनादेवी व बंधू यांना देते.

Leave a Reply