कापूस खरेदीत हेराफेरी करणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांनी धो धो धुतले

बुलढाणा : २९ नोव्हेंबर – बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल भागात शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीत हेराफेरी करणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांनी रंगे हात पकडून धो धो धुतला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात झाला. बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर अकोट येथील व्यापारी शेतकऱ्यांचा कापूस जादा भावाने खरेदी करण्याचे आमिष दाखवून कापूस खरेदीत वजन काट्यात हेराफेरी करून शेतकऱ्यांची लूट करीत होता.
यावेळी शेतकऱ्यांनी या व्यापाऱ्याला वजन काट्यामध्ये घोळ करून क्विंटल मागे तब्बल वीस किलो कापूस कमी मोजत असताना रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन अनेक व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कापूस खरेदी करत आहेत.
हे ही वाचा : सावरकर देशाला कलंक होते, काँग्रेसच्या माजी आमदाराचे खळबळजनक वक्तव्य
मात्र कापूस खरेदी करताना वजन काट्यामध्ये प्रचंड प्रमाणात घोळ असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लाडनापूर येथील या घटनेत शेतकऱ्यांनी वजन काट्यामध्ये घोळ करणाऱ्या या व्यापाऱ्याला चांगला चोप दिला आहे. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

Leave a Reply