आपल्या वक्तव्याबद्दल रामदेवबाबांनी मागितली माफी

मुंबई : २८ नोव्हेंबर – जाहीर कार्यक्रमात महिलांच्या वस्त्रासंबंधी अनुदार उद्गार काढल्याबद्दल बाबा रामदेव यांनी माफी मागितली असून आपल्याला महिलांची साधी वस्त्रे असा उल्लेख करायचा होता असे त्यांनी म्हटले आहे
बाबा रामदेव यांनी महिलांसंबंधी अनुदार उद्गार काढल्यावर राज्य महिला आयोगाने त्यांना नोटीस बजावली होती. त्याला बाबा रामदेव यांनी उत्तर पाठवले आहे. वरील उदगारांबद्दल आपल्याला खेद वाटत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आपण महिला आयोगाच्या नियमानुसार कोणताही गुन्हा केला नाही. आपण जागतिक स्तरावरही महिला सबलीकरणासाठी काम केले आहे. तसेच महिलांना समाजात समानतेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत. केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनांनाही आपण नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. तसेच देशात महिला सक्षमीकरणासाठी अनेक संघटनांबरोबरही एकत्र कामही केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply