लखुजी जाधव – विजय लिमये

इतिहास अनेक घटनांचा साक्षीदार आहे, पण त्या गोष्टी सामान्यपणे सर्वांना ठावूक असतात असे नाही. अनेक वेळेस आपण त्या जागांना भेटी देतो, पण इतिहास माहीत नसल्याने नुसते पाहून परत येतो.

जिजाऊ चे वडील लखुजी जाधव आपल्या पत्नी आणि मुलांसहित मोघलांना सोडून निजामशाहीत सेवेसी डेरेदाखल झाले.

निजामाची पहिली भेट घेण्यासाठी आणि त्यांच्याकडून जहागिरी घेण्यासाठी लखुजी जाधव सहकुटुंब सहपरिवार
सिंदखेडराजा येथून देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचले, तिथे त्यांनी मुक्काम केला आणि निजामशहाला भेटण्याची वेळ आणि दिवस ठरला, श्रावण महिन्यातील पौर्णिमा, अर्थात नारळी पौर्णिमा, तारीख 25 जुलै 1629.

लखुजी जाधव आपल्या दोन मुलांसहित आणि नातवाला घेऊन देवगिरी (दौलताबाद) किल्ल्यात मार्गस्थ झाले. निजामाला भेटण्यास दरबारात दाखल झाले खरे, परंतू निजाम एक वेगळीच योजना बनवून बसला होता, त्याच्या मनात कपट होते, मोठा घात करायचा होता, नव्हे तशी योजनाच रचली होती.

लखुजी जाधव, आणि मुलांनी निजामाला मुजरा केला परंतू त्यांचा मुजरा धुडकावून लावत निजाम सिंहासनावरून उठून आत निघून गेला. लखुजींना निजामाचे असे वागणे अतिशय विचित्र वाटले आणि तो अपमान खूप जिव्हारी लागल्याने उलट पाऊली दरबारातून बाहेर जाऊ लागले.

अचानक म्यानातून तलवारी निघू लागल्या, काही कळायच्या आतच अचानक लखुजिंच्यावर हल्ला झाला.
अश्या अनपेक्षित हल्ल्याने लखुजी व मुले भांबावून गेली, त्यांनी आपल्याही तलवारी काढून प्रतिहल्ला केला परंतु शत्रू संख्येने मोठा असल्याने त्यांना फारसा प्रतिकार करता आला नाही. चारही विरांना कपटाने घात करून देवगिरीच्या किल्ल्यात भर दरबारात ठार मारण्यात आले.

त्यांच्या पत्नी या कपटातून सावरू शकल्या नाहीत, आणि सिंदखेड राजा येथे येवून सती गेल्या. कपटाची ही बातमी जिजाबाईंना समजली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. निजामानं केलेल्या या क्रूर कृत्याचा बदला घेण्याची जिजाऊंनी शपथ घेतली. पुढे स्वराज्य स्थापित करण्याची इथूनच सुरुवात झाली.

विजय लिमये ( 9326040204)
संदर्भ: बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती
राजाशिवछत्रपती

समाजमाध्यमावरुन साभार..

Leave a Reply