वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

चंद्रपूर : २७ नोव्हेंबर – चंद्रपूरमधील नागभीड तालुक्यातील पाहार्णी येथे वाघाने केलेल्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. वनिता वासुदेव कुंभरे ( ५७), असे मृत महिलेचे नाव आहे.
वनिता कुंभरे शनिवारी दुपारी शेतातील गवत कापत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी उशिरापर्यंत त्या घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी गावकऱ्यांसोबत शेतशिवरात शोध घेतला असता त्यांचा मृतदेहच आढळला. मृत वनिता कुंभरे यांच्या पश्चात पती, दोन मुले आणी एक मुलगी आहे. माहिती मिळताच वनविभाग नागभीड येथील कर्मचारी पाहार्णी येथे दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply