अखिल भारतीय साहित्य परिषदेची नागपूर जिल्हा कार्यकारिणी गठीत

अध्यक्षपदी मनीषा अतुल तर डॉ. वसुधा वैद्य महामंत्री

नागपूर : २२ नोव्हेंबर – अखिल भारतीय साहित्य परिषदेची नागपूर जिल्हा कार्यकारिणी नुकतीच गठीत झाली असून ख्यातनाम मराठी साहित्यिक मनिषा अतुल यांची अध्यक्षपदी तर कवयत्री डॉ. वसुधा वैद्य यांची महामंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. कवी आणि लेखक राजेश कुबडे हे कार्याध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहेत.
नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली, साहित्य परिषदेचे विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत निवडणूक प्रक्रियेचे संचालन विदर्भ प्रांत महामंत्री ऍड. सचिन नारळे यांनी केले.
नागपूर जिल्हा कार्यकारिणीतील अन्य पदाधिकारी असे आहेत, संघठन मंत्री – डॉ. सुरुची डबीर आणि डॉ. गिरीश सपाटे, प्रसिद्धी व प्रचार प्रमुख – रश्मी पादवाड मदनकर, विदर्भ कार्यकारिणी प्रतिनिधी – डॉ. स्वाती मोहरील, कार्यकारिणी सदस्य – प्रशांत पनवेलकर, डॉ. संजीवनी लांजेवार, डॉ. पावन कांबळी, शलाका जोशी,अनंत देशपांडे, अरुण घारपुरे, मार्गदर्शक डॉ. राजेंद्र नाईकवाडे आणि प्रकाश एदलाबादकर.
अध्यक्षपदी निवड झालेल्या मनीषा अतुल या लेखिका आणि कवयित्री म्हणून प्रसिद्ध असून साहित्य चळवळीतही त्या सक्रिय आहेत, त्यांची ११ पुस्तके प्रकाशित झाली असून विविध मान्यवर पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत. विविध वृत्तपत्रांतून त्यांनी स्तंभलेखनही केले आहे.
महामंत्री म्हणून निवडण्यात आलेल्या डॉ. वसुधा वैद्य या नागपूर महानगरपालिकेत माध्यमिक शिक्षिका असून लेखक, कवयित्री आणि समीक्षक तसेच वक्ता म्हणून विख्यात आहेत. त्यांची ५ पुस्तके प्रकाशित झाली असून विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्या सन्मानित झाल्या आहेत. कार्याध्यक्षपदी निवड झालेले राजेश कुबडे हे प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनीयरिंगमध्ये कार्यरत असून कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा एक कवितासंग्रह प्रकाशित झाला असून विविध नियतकालिकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. संकसृतिक आणि वाङ्मयीन चळवळीतही ते सक्रिय आहेत.
नवनिर्वाचित कार्यकारिणीचे विडंब प्रांत अध्यक्ष ऍड. लखनसिंह कटरे कार्याध्यक्ष अविनाश पाठक महाराष्ट्र कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रवीण दवणे, कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र पाठक प्रभृतींनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply