राज्यपाल यांचं धोतर फाडणाऱ्याला 1 लाखांचे रोख बक्षीस – राष्ट्रवादीने लावले बॅनर

पुणे : 20 नोव्हेंबर – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कोणत्या ना कोणत्या विधानामुळे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादीने निषेध व्यक्त करत बॅनरबाजी केली आहे. राज्यपाल यांचं धोतर फाडणाऱ्याला 1 लाखांचे रोख बक्षीस दिले जाईल, अशी घोषणाच केली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्याचा निषेध करत पुण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप शशीकांत काळे यांनी बॅनर लावले आहे.
आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श होते आणि कायम राहणारच. उतरत्या वयात धोत्रात घाण करण्यासारखे विषारी वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध आहे. त्यांचे धोतर फाडणाऱ्यास आणि फेडणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असा मजकूर या बॅनरवर आहे.
दरम्यान, राज्यपालांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला असून संभाजीराजे छत्रपती यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, असं म्हणत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. याबाबत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढा, असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी सातत्याने अशी बडबड का करतात असा मला प्रश्न पडला आहे. मी म्हणतो यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढा. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून विनंती आहे की अशी व्यक्ती महाराष्ट्रात आम्हाला नको आहे, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं.

Leave a Reply