महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालकाची तत्काळ बदली करा – गोपीचंद पडळकर

नागपूर : १६ नोव्हेंबर – विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण कोणत्या संस्थेकडून घ्यायचे याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. महाज्योतीने यासाठी स्पर्धात्मक प्रक्रिया न राबवता आघाडी सरकाच्या काळातील कंत्राटे पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू ठेवले आहे. याला जबाबदार व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार डांगे यांची येथून तात्काळ बदली करावी, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आघाडी सरकारच्या काळात स्थापित झालेल्या अनेक चुकीच्या प्रशासकीय प्रथा आजही महाज्योतीने सुरू ठेवल्या. महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक, खात्याचे सचिव यांच्या विरोधात बातम्या माध्यमात आल्या.विद्यार्थ्यांना स्पर्धा पररीक्षेचे प्रशिक्षण कोणत्या संस्थेकडून घ्यायचे याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. परंतु कोणतेही कंत्राट न मागवता. आघाडी सरकाच्या काळातील कंत्राटेच महाज्योतीच्या संचालकांकडून पुढे रेटले जात आहे.
महाज्योती संस्थेची स्थापना एका उद्दात्त हेतूने करण्यात आली. तो साध्य करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक बदलून तिथे पुर्णवेळ व बहुजन विद्यार्थ्यांचे प्रश्न संवदेनशीलतेने हाताळण्याऱ्या अधिकाऱ्यास संधी द्यावी, अशी मागणी पडाळकर यांनी केली. शिंदे- भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर तातडीने या खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी महाज्योती संस्थेचे अनेक रखडलेले निर्णय एका दिवासात मार्गी लावले आहेत.

Leave a Reply