शरद पवार यांना विनंती आहे, की आव्हाड यांचं निलंबन करा – चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : १४ नोव्हेंबर – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आता जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे. शरद पवार यांना विनंती आहे, की आव्हाड यांचं निलंबन करा, असं ते म्हणाले. कोणी आव्हाड यांचं समर्थन करत असेल तर त्यांना पण गुन्ह्यात घ्यायला हवं. आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचं सीसीटीव्ही फुटेजही आहे, असंही ते म्हणाले.
आव्हाड यांची स्टटंबाजी यापुढे चालणार नाही कारण आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नाही, तर देवेंद्र फडणवीस आहेत. तो व्हिडीओ पाहा.राष्ट्रवादीत नैतिकता असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसने निलंबन करायला हवं. आमदाराला राजीनामा द्यायचा असेल तर द्या, अजित पवार शरद पवार राजीनामा घेणार का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
यावेळी बावनकुळे यांनी पवार कुटुंबावरही निशाणा साधला. ‘पवार कुटुंबीयांनी बारामतीमध्ये 69 वर्ष सत्ता आणि सरकार चालवलं म्हणजे उपकार नाही केले. गावातील गावात कशाला संबंध खराब करायचे, त्यामुळे बारामतीमध्ये त्यांची दहशत आहे. आता गेलेले शिंदेंसोबत गेलेले आमदार त्यांच्या दहशतीखाली राहात नव्हते. दहशतीमध्ये राहाणं त्यांनी आवडलं नाही, म्हणून ते शिंदेंसोबत गेले, असंही बावनकुळे यावेळी बोलताना म्हणाले. शिंदे-भाजप एकत्रितपणे महाराष्ट्रामध्ये निवडणूका लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना बावनकुळे म्हणाले, की ‘यांच्या डायसला फक्त चार लोक राहतील. कीर्तीकर पायी पायी फिरत होते शिवसेनेसाठी, मग त्यांनाही बाहेर जावं लागतं हे वाईट आहे. त्यांनी शिवसेनेसाठी काम केले आहे. पण पवार ट्रॅपमध्ये उद्धव ठाकरे अडकले आणि महाराष्ट्राचं वाटोळं केलं. पुढे 2024 ला त्यांच्यासोबत चारच लोक राहतील, चांगले कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना सोडून जात आहेत’.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबाबत बोलताना ते म्हणाले, की ‘महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या यात्रेचा काही परिणाम झाला नाही. राहुल गांधी यांच्या यात्रेचं लोकांना काही घेणं देणं नाही. ‘

Leave a Reply