शरणकुमार लिंबाळे यांच्यासोबत राहित्यिक संवाद, अ. भा. साहित्य परिषदेचे आयोजन

नागपूर : ४ नोव्हेंबर – अखिल भारतीय साहित्य परिषद विदर्भ प्रांताच्या वतीने रविवार दि. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता ख्यातनाम साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्याशी साहित्यिक संवाद या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे, ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. राजेंद्र नाईकवाडे, ईश्वर नंदपुरे, आणि प्रकाश एदलाबादकर या कार्यक्रमात लिंबाळेंशी संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आणि अ. भा. साहित्य परिषद विदर्भ प्रांताचे अध्यक्ष ऍड. लखनसिंह कटरे हे राहणार आहेत. कार्यक्रमात उपस्थित श्रोत्यांनाही काही वेळ प्रश्न विचारण्याची संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल. हा कार्यक्रम दक्षिण अंबाझरी मार्गावरील अंध विद्यालय परिसरातील नवदृष्टी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष अविनाश पाठक, महामंत्री ऍड. सचिन नारळे, उपाध्यक्ष महेश आंबोकर प्रभृतींनी केले आहे.

Leave a Reply