बुलढाण्यात नळगंगा प्रकल्पाच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रकल्प अधिकाऱ्यांची सहपरिवार पिकनिक

बुलडाणा : ३ नोव्हेंबर – बुलडाण्यातील सर्वात मोठा असलेला नळगंगा प्रकल्पाच्या प्रतिबंधित क्षेत्रात म्हणजेच प्रकल्पाच्या भिंतीवर आणि गेटवर काही अधिकारी आपल्या परिवारासह बिनधास्तपणे फिरताना आढळून आले. इतकचं नाही तर प्रकल्पाच्या भिंतीवर अधिकाऱ्यांच्या बाईक्स आणि वाहने सुद्धा नेण्यात आली जिथे सामान्यांना जाण्यास मज्जाव आहे. हा प्रकार इथचं थांबला नाही, तर परिवारातील सदस्यांना प्रकल्पाचे गेट उघडून दाखवण्यात आला.
बुलडाण्याच्या मोताळा तालुक्यातील नळगंगा प्रकल्पावर हा प्रकार घडला आहे. काही अधिकारी आपल्या परिवारासह पिकनिक करायला आलेले होते. सिंचन विभागाचे उपविभागीय अधिकारी एस.पी.पाटील हे आपल्या मुलांबळांसह ते धरणाच्या अतिशय संवेदनशील व प्रतिबंधित असलेल्या क्षेत्रांत म्हणजे धरणाच्या भिंतीवर आणि गेटवर अगदी मुक्त संचार करत होते. आपल्या परिवारातील सदस्यांना धरणाचे दरवाजे कसे उघडतात, कसा पाण्याचा विसर्ग केल्या जातो हे दरवाजा उघडून दाखवला. इतकंच काय तर आपल्या मुलींना धरणाच्या भिंतीवर बाईक राईडचा आनंद ही घेऊ दिला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे.
खरंतर हे सिंचन विभागाचे अधिकारी असूनही इतके बेजबाबदारीने वागत असल्याचा हा प्रकार आहे. मात्र त्यांना विचारणा केली असता त्यांनी परिवारासह गेलो नव्हतो तर धरणाच्या गेटच्या दुरस्तीच्या कामाला गेलो होतो असं उत्तर दिलं आहे.
कुठल्याही धरणाचे गेट हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय व धरणाखालील गावाना सूचना देऊन उघडली जातात मात्र विना परवानगी गेट उघण्यात आलं. याला जवाबदार कोण असा सवाल उपस्थित राहत आहे आहे.

Leave a Reply