उपराजधानीत ९७१ नवे बाधित, ३८९४ कोरोनामुक्त तर ३० मृत्यूची नोंद

नागपूर : १७ मे – राज्याच्या उपराजधानीत आज रुग्णसंख्येत बरीच घट दिसून आली आहे. जवळपास दोन महिन्यांनंतर आज रुग्णसंख्या हजाराच्या खाली आली आहे. पूर्व विर्दभालाही दिलासा मिळाला आहे. विदर्भात २२७९ रुग्ण आढळून आले असून ७४४१ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर ६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर नागपुरात ९७१ रुग्ण आढळून आले असून ३८९४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या २४ तासात नागपुरात ९७१ रुग्णांची नोंद झाली असून त्यात ४७४ रुग्ण ग्रामीण भागातील तर ४८७ रुग्ण शहरातील तर १० रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत शहराची एकूण रुग्णसंख्या आता ४६४२१४ आहे. तर शहरात आज ३० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यात ९ ग्रामीणमधील ११ शहरातील तर १० इतर जिल्ह्यातील रुग्ण आहेत. शहराची मृत्युसंख्या आता ८५८० वर पोहोचली आहे.
शहरात आज १३२६७ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात ३४४३ ग्रामीण भागात तर ९८१८ चाचण्या शहरात घेण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासात ३८९४ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून एकूण कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४२८७४४ वर पोहोचली आहे. तर कोरोना बरे होण्याचे प्रमाण ९२.३६ टक्के झाले आहे. शहरात सध्या २६८९० ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यात १३६२२ ग्रामीण भागातील तर १३२६८ शहरातील रुग्ण आहेत.

Leave a Reply