मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

भक्तिभाव

रोजच्या सारखी आज पूजा करायला बसली. पूजा झाली, आरती झाली, पोथी वाचली आणि जप करायला बसली तर माझ्या पायाला एक मुंगी चावली. माझे ध्यान हटले. जप करताना disturb झाला. थोडावेळ आपण का सहन नाही करू शकलो हा प्रश्न मनात सतावत होता. ह्याचाच अर्थ आपण मनानी जप करत नव्हतो अस माझ्या मनात आल, ह्यावरून मला कर्णाची गोष्ट आठवली आपल्या गुरूला व्यत्यय नको म्हणून आपल्या मांडीवर विंचुचा डंख कर्णाने सहन केला. त्या कर्णाची तेवढी भक्ती होती. आपल्या माणसात तेवढी ताकद नसते अथवा तेवढी आपली भक्ती धारणा नसते. कारण माणसाच्या मनात अनेक विचार थैमान घालत असतात. असो.
दुसऱ्या विषयी मनात चांगली भावना असणे हे कोणाला जमेल, तर ज्याच मन पवित्र, शुद्ध, निरागस असेल त्याला. माणूस मंदिरात का जातो? आपलं मन शांत करण्यासाठी. मंदिर ह्याचा अर्थ मन+मंदिर म्हणजेच मंदिर. मंदिरात गेल्यावर आपले मन, त्यात मानवाची दहा इंद्रिये शांत, स्थिर होतात व एकाग्र होतात तेच हे ठिकाण म्हणजे मंदिर होय. हे मन आणि आपली दहा इंद्रिये स्थिर होण्यासाठी जेथे भक्ती भावाने आपली इश्ट देव/देवतांची मन:पूर्वक पूजा केली जाते असे हे ठिकाण म्हणजे मंदिर होय.
मंदिरात असणाऱ्या देव/देवता ह्या मूर्तीच्या स्वरूपात आपल्याला दिसून येतात. मग ह्या मूर्ती पाषाणाच्या असो, संगमवरीच्या असो, पितळेच्या असो अथवा चांदीच्या असो. ह्या मूर्तीच असतात. हा देव स्थूल स्वरुपी नसून मूर्तीच्या स्वरूपात असतात. म्हणुच तर त्या बोलू शकत नाही अथवा काही सांगू शकत नाही म्हणूनच त्या मूर्तीची देखभाल करण्यासाठी पुजारी असतो. जो केवळ मानव व देवदेवता मधील एक मध्यस्थ असतो. ज्ञानदानाच्या कार्यापेक्षा त्याचे कार्य हे अधिक असते. पूजा अर्चा करण्याचे कार्य तो करत असतो. त्याच प्रकारे मंदिरात पूजा अर्चा करण्याचा काळ, मानवाने मंदिरात जाण्याची वेळ ही ठराविक असते. मानव हा पूजा अर्चा करण्यासाठी मंदिरात जातो पण तो तिथे राहायला जात नाही म्हणूनच तर त्याला मंदिर म्हणतात.

पल्लवी उधोजी

Leave a Reply