मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

मनाचं गाठोड

आपल्या मनात जे काही प्रत्यक्षात घडेलच अस काही नाही. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडणं ह्याला नशीब लागतं. आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात त्या घडल्यानंतर मनात येत की, हे आपल्याला टाळता आलं असतं आपण उगाच घाई केली. लग्न झाल्यानंतर संसार सुखाचा झाला किंवा सगळं मनासारखं मिळालं की वाटतं आपण जे काही केलं ते योग्य केलं. पण एखादीला लग्न झाल्यानंतर तिच्या संसारात दुःखच दुःख आली की तिला हे मनात येईल. आपली पसंती ही अयोग्य होती आपण उगाच घाई केली आपल्याला ह्याही पेक्षा चांगल स्थळ मिळालं असत पण शेवटी उपयोग नसतो. शेवटी असे गाठोडे घेऊन आयुष्याची वाटचाल करावी लागते प्रारब्ध कोणाला चुकला आहे. प्रारब्ध, संचित, क्रियमान, भोग याशिवाय आयुष्यात दुसरं काय असणार. या प्रारब्धात अडकलेल्या मनाला दिलासा देणारा काही असेल तर ते आहे तुमचे आंतरिक बळ. आंतरिक बळ जोपर्यंत तुमच्या बरोबर आहे तोपर्यंत तुमचे कोणी वाईट करू शकत नाही.
आपण टीव्ही वर मालिका बघतो त्यात जी चांगली व्यक्ती असते ते नेहमी सगळ्यांशी चांगलीच वागते. तिचे कौतुक होतं हे बघून दुसरी व्यक्ती तिला खाली पडण्याचा आटोकाट प्रयत्न करते शेवटी तीच खाली पडते. असेच काहीसे आपल्या आयुष्यात घडत असतं. आपण समोरच्याशी कितीही चांगला वागण्याचा प्रयत्न करतो पण आपल्याबद्दल तिच्या मनात एक कतुत भावना असते हे आपल्याला नंतर कळतं तेव्हा आपलं मन दुखावलं जातं. माझ्या बाबतीत असे बरेच वेळा झाल. शेवटी मी स्वतःला त्रास न करता स्वामींचे नाव घेते जेणेकरून मन शांत राहील. शेवटी तेच आपला आधार . असो.
कुणीही कधीही आपली मदत मागत असेल, न मागताही आपल्याला शक्य असेल तर प्रसंगी पदरमोड करूनही करावी. मानवी मनाला कृतज्ञता शिकविण्याची गरज नसते. अवघड प्रसंगी केलेल्या मदतीची जाण दुष्ट लोकही ठेवतात. म्हणून कोणी मदत मागत असेल, ही आपल्या एकाकीपणावर मात करण्याची संधी मानावी. अर्थातच आपापल्या कार्यशक्तीच्या मर्यादेत शक्य असेल तरच.
एवढंच माझं म्हणणं आहे.

पल्लवी उधोजी

Leave a Reply