हे देखील माहित असू द्या… – वेद कुमार

पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ED आणि CBI चा वापर करतात असा काँग्रेस आणि त्यांची पिल्लावळ आरोप करत असते. बरं! मोदी वापर करतात की नाही ते नंतर बघूया, त्याआधी काँग्रेसने गेल्या 100 वर्षांत त्यांना विरोध करणाऱ्या लोकांच्या मागे एजन्सीज्, पोलिस आणि सरकारी यंत्रणेचा ससेमिरा लावून पक्षांतर्गत विरोधकांचाच कसा सत्कार केला बघूया…

आज पासून 100 वर्षांपूर्वी 1923 मध्ये चित्तरंजन दास यांनी काँग्रेस सोडली आणि स्वराज पक्षाची स्थापना केली, 1925 पर्यंत ब्रिटिशांनी त्यांना असे घोडे लावले की हा स्वराज पक्ष दास यांना काँग्रेसमध्ये विलीन करावा लागला. 1939 मध्ये महात्मा गांधींशी मतभेद होऊन सुभाषचंद्र बोस आणि शार्दुल सिंग यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक नावाचा वेगळा पक्ष स्थापन केला, तर काँग्रेसने व ब्रिटिशांनी त्यांचं काय केलं हे मी तुम्हाला सांगायला नको. हे झालं स्वातंत्र्याआधी.

स्वातंत्र्यानंतर 1951 मध्ये तीन गद्दारांनी 3 काँग्रेसी नेत्यांनी 3 पक्ष काढले. कृपलानी यांनी किसान मजदूर प्रजा पार्टी, तंगुतुरी प्रकाशम आणि एनजी रंगा यांनी हैदराबाद स्टेट प्रजा पार्टी आणि नरसिंह भाई यांनी सौराष्ट्र खेडूत संघ. काँग्रेसने या तिघांच्या मागे एवढी लफडी लावली की यातील हैदराबाद स्टेट प्रजा पार्टी मग किसान मजदूर प्रजा पार्टीमध्ये विलीन झाली. पुढे किसान मजदूर प्रजा पार्टी प्रजा सोशालिस्ट पार्टीमध्ये विलीन झाली आणि सौराष्ट्र खेडूर संघ स्वतंत्र पक्षात विलीन झाला. सी.राजगोपालाचारी यांनी 1956 मध्ये पक्ष सोडला आणि भारतीय राष्ट्रीय लोकशाही काँग्रेस पक्षाची स्थापना केली. वरील जेवढी नावे तुम्ही वाचली, यातील एकही पक्ष (वेगवेगळी आयुधे वापरून) काँग्रेसने टिकू दिला नाहीत. सगळे पक्ष गायब झाले! मग, 1974 मध्ये स्वतंत्र पक्षाचे उरल्या-सुरल्या अस्तित्वाचे भारतीय क्रांती दलात विलीनीकरण झाले. हा क्रांती दलच मग गायब करण्यात झाला. तसं कागदोपत्री हा क्रांती दल लोकदलात विलीन झाला असं म्हणतात. त्यादरम्यान, 1964 मध्ये केएम जॉर्ज आणि 6 नेत्यांनी केरळ काँग्रेस नावाचा नवा पक्ष स्थापन केला. मात्र, नंतर या पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांना घोडे लावून स्वत:चे सात वेगळे पक्ष काढायला लावले आणि मग सातही पक्ष गायब झाले. यातील काही नेत्यांच्या मृत्यूही रहस्यमय परिस्थितीत झालेत.

1966 मध्ये काँग्रेस सोडलेल्या हरेकृष्ण मेहताब यांनी ओडिशा जन काँग्रेसची स्थापना केली. पुढे त्यांचा असा छळ करण्यात आला की नाईलाजास्तव त्यांनी आपला पक्षच जनता पक्षात विलीन केला. 1966 मध्ये काँग्रेस सोडलेल्या या ओडिशाच्या माजी मुख्यमंत्र्याचा वचपा 1976 साली आणीबाणीत त्यांना तुरुंगात थर्ड-डिग्री देऊन काँग्रेसने काढला. 1967 साली काँग्रेसमधून फुटून बांग्ला कांग्रेस आणि विशाल हरियाणा पार्टी असे दोन पक्ष बनले, आणि जसे बनले तसेच ते नंतर पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन करावे लागले.

1968 साली काँग्रेस मधून फुटून मणिपुर पीपल्स पार्टी बनली, ती मात्र अजून अस्तित्वात आहे कारण तेंव्हाच्या काँग्रेसी लोकांना तिकडे इर्शान्येत जास्त इंटरेस्ट नव्हता, दिल्लीतील पक्षांतर्गत क्लेश वाढले होते (1969 मध्ये इंदिरा गांधीचीच पक्षातून हकालपट्टी होण्याआधी चा काळ). कामराज आणि मोरारजी देसाई यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ऑर्गनायझेशन नावाचा वेगळा पक्ष स्थापन केला, जो त्यांनी नीट जनता पक्षात विलीन झाले.

1969 मध्ये बिजू पटनायक यांनी ओडिशात उत्कल काँग्रेसची स्थापना केली, त्यांचा काँग्रेस सोडल्यावर केलेला छळ हेच कारण होते की त्यांनी परत कधीच काँग्रेस जॉईन केली नाही. 1971 साली काँग्रेसमधून बनलेला बिप्लोबी बांग्ला कांग्रेस हा पक्ष डाव्या आघाडीत विसावला. 1977 साली जगजीवन राम यांनी कांग्रेस फॉर डेमोक्रेसी तर बनवली, मग भीतीपोटी मजबुरीत जनता पक्षात विलीन केली. 1979 मध्ये डी देवराज उर्स यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उर्स नावाचा पक्ष स्थापन केला तो कुठे गेला समजलंच नाही. 1980 मध्ये एके एंटनी ने कांग्रेस ए बनवली आणि एकदा वरून दम दिल्यावर काँग्रेस मध्ये विलीन केली. 1981 मध्ये शरद पवारांनी इंडियन नेशनल कांग्रेस सोशलिस्ट बनवली आणि जास्त लोड न घेता पुन्हा काँग्रेसमध्येच विलीन केली.

1981 मध्ये जगजीवनराम ने पुन्हा एकदा पक्ष बनवत इंडियन नेशनल कांग्रेस (जगजीवन) बनवली, जी टेक-ऑफ होण्याआधी क्रॅश झाली. 1984 साली शरतचंद्र सिन्हा यांनी इंडियन नेशनल कांग्रेस सोशलिस्ट (S) बनवली आणि बनवताच संपली.

1984 येता-येता सगळे काँग्रेसमधून निघालेले पक्ष गायब झाले आणि राहिली फक्त काँग्रेस!!!

स्वातंत्र्याआधी पासून ते नंतर 1984 पर्यंत, काँग्रेसचा कोणताच पक्षांतर्गत विरोधक नेहरू-गांधींसमोर समोर टिकला नाही हे सत्य आहे. अगदी इंदिरा गांधींच्या हत्येनंतरही काही वर्षे काँग्रेसचा बोलबाला काही प्रमाणात शाबूत होता. 1986 मध्ये प्रणबदांनी राष्ट्रीय समाजवादी कांग्रेस बनवली, पण राजीव गांधींच्या एका सल्लागाराने काही फाईली काढल्यावर नीट काँग्रेस मध्ये विलीन केला त्यांनी पक्ष. 1988 साली शिवाजी गणेशन ने थामीजागा मुन्नेत्रा नावाचा पक्ष काढला आणि केंद्राशी वैर परवडत नसल्याने जनता दलात विलीन केला. 1990 साली बंसी लाल ने हरियाणा विकास पार्टी बनवली आणि पुन्हा काँग्रेस मध्ये विलीन केली. 1994 साली, एकाच वर्षात अर्जुन सिंग आणि एनडी तिवारी ने ऑल इंडिया इंदिरा कांग्रेस, बंगरप्पाने कर्नाटक काँग्रेस पार्टी आणि वजापड़ी रामामूर्ति ने तमिझागा राजीव कांग्रेस बनवली आणि या सगळ्यांनी आपापले पक्ष पुन्हा काँग्रेस मध्ये झक मारून विलीन केले. 1996 मध्ये माधवराव सिंधिया यांनी मध्य प्रदेश विकास कांग्रेस बनवली आणि अजिबात फडफड न करता स्वगृही गेले. 1996 मध्ये जियोंग अपांग यांनी अरुणाचल काँग्रेस बनवली आणि माफी मागत काँग्रेसमध्ये विलीन केली. जीके मूपानार आणि जीके वासान यांनी 1996 मध्ये तमिळ मनीला काँग्रेस स्थापन केली आणि 2001 मध्ये मजबुरीत काँग्रेसमध्ये विलीन केली, ते कितीही घुसमट होत असली तरी थेट 2014 मध्येच परत वेगळे झाले. 1997 मध्ये सुखराम यांनी हिमाचल विकास कांग्रेस बनवली आणि काँग्रेस मध्ये विलीन करण्या शिवाय त्यांच्या समोर पर्याय शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती काँग्रेसने त्यांच्यावर आणली. 1998 मध्ये सुरेश कलमाडी यांनी महाराष्ट्र विकास अघाडी नावाचा पक्ष बनवला आणि पुन्हा काँग्रेस मध्ये तो त्यांना विलीन करावाच लागला. 2000 साली फ्रैंसिसको सरडिन्हा यांनी गोवा पीपल्स कांग्रेस बनवली आणि 2001 मध्ये पी चिदंबरम यांनी कांग्रेस जननायक पेरावई बनवली. पक्ष स्थापन करताना मोठ्या बाता मारणाऱ्या या दोघांनाही आपले पक्ष पुन्हा कांग्रेस मध्येच नीट विलीन करावे लागले. 2005 साली पी.कनन यांनी काँग्रेस सोडून पुडुचेरी मुन्नेत्रा कांग्रेस बनवली, त्यांनाही परत काँग्रेस मध्ये जावं लागलं. 2005 साली के करुणाकरण यांनी डेमोक्रेटिक इंदिरा कांग्रेस आणि 2007 साली कुलदीप विश्नोई यांनी हरियाणा जनहित कांग्रेस पक्ष स्थापन केले. त्यांनी आपले पक्ष परत काँग्रेसमध्ये ज्या परिस्थितीत विलीन केले त्यासाठी एक शब्द आहे – ब्लॅकमेल!

आता फक्त विचार करा : जर काँग्रेसने आपल्याच लोकांची अशी ठासली असेल, तर विरोधकांची काय अवस्था करून ठेवली असेल?

जो पर्यंत नेहरू आणि इंदिरा होते, तोपर्यंत सीबीआय, इन्कम-टॅक्स, इतर सरकारी एजन्सी, अगदी राज्यांचे पोलिसदल आणि काही बाबतीत तर बाहेरचे सीआयए, केजीबी सगळ्यांनी आपापले रोल इमानेइतबारे निभावले. खाली नमूद केलेले काही ‘अपवाद’ कसे टिकले, तर 1984 मध्ये राजीव गांधी राजकारणात आले आणि त्यांची असल्या खेळांवरील पकड ढिल्ली झाली. मधल्या काळात पक्ष सोडणाऱ्या काही जणांना म्हणूनच यश मिळाले. त्यानंतर 2005 ते 2014 पर्यंत पुन्हा एकदा काँग्रेसने आपले रंग दाखवले आणि एजन्सीज् चा वापर करून व यंत्रणा राबवून आपल्या विरोधात जाणाऱ्यांविरुद्ध राजकीय दहशत माजवली होती. मात्र, यात साधारण 2011 नंतर सिव्हिल सोसायटी, CAG सारख्या संस्था, सुप्रीम कोर्टाचे ऍक्टिव्हिजम् आणि काही प्रमाणात सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण. होत असलेला दबाव यामुळे काँग्रेस आपली यंत्रणा ‘मोकळेपणा’ने वापरू शकली नाही, काही मर्यादा आल्या.

काही अपवाद :

पण, 1998 मध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस सोडली आणि अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसची स्थापना केली आणि टिकली. एका वर्षानंतर 1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि टिकले. गांधी परिवार सगळ्यात कमजोर असताना हे दोन पक्ष बनले म्हणून बस्तान बसवू शकले आणि पुढे यांनीही काँग्रेसशीच जुळवून घेतले म्हणून टिकले. 2011 साली वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांनी बनवलेली वायएसआर काँग्रेस आणि एन रंगास्वामी यांनी पुद्दुचेरीत बनवलेली ऑल इंडिया एनआर कांग्रेस पण अजून टिकून आहेत. 2016 साली अजीत जोगी यांनी स्थापन केलेली छत्तीसगढ़ जनता कांग्रेस आणि 2021 साली कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बनवलेली पंजाब लोक कांग्रेस पार्टी अजून तग धरून आहेत.

अजूनही कोणाला वाटत असेल की मोदी ED आणि CBI चा वापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी करत आहेत, तर मी त्यांच्याशी नक्कीच असहमत आहे. विरोधकांचे जाऊद्या, काँग्रेसने आपल्याच लोकांचे आवाज कसे दाबले आणि त्यांची करियर कशी बरबाद केली ते पाहिलं, तर नरेंद्र मोदी मला देव माणूस वाटत आहेत.. देव माणूस!!

वेद कुमार

समाजमाध्यमावरून साभार…

Leave a Reply