भरदुपारी बुलढाण्यात महिलेचा खून, ६२ हजारांचा ऐवज लंपास

बुलढाणा : २१ ऑगस्ट – खामगांव तालुक्यातील उमरा लासुरा येथील 65 वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्यात आलायं. हा घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडालीयं. अंगावरील आणि घरातील सोन्याचांदीचे दागिने तसेच गल्ल्यातील 9 हजार रूपये असा एकूण 62 हजार 200 रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकिस आलीयं. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येत असलेल्या उमरा येथील रहिवाशी कमलाबाई जनार्धन सोनोने ह्या दुपारी घरात एकट्याच असल्याचा गैरफायदा चोरट्यांनी घेऊन ही चोरी आणि खून केलायं.
खामगांव तालुक्यातील उमरा लासुरा येथील घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कमलाबाई सोनोने या घरामध्ये एकट्याच असतांना अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून त्यांचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर कमलाबाई यांच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने आणि गल्ल्यातील नगदी 9 हजार रूपये असा एकूण 62 हजार 200 रूपयाचा ऐवज चोरून नेलाय.
चोरी करून अज्ञात व्यक्तीने घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना वृद्ध महिलेचे नातेवाईक घरी आल्यावर उघडकिस आली. याप्रकरणी जनार्धन रामचंद्र सोनोने यांनी खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरूध्द भादंवि कलम 302,392 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलायं. तर संशयित चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

Leave a Reply