जम्मू काश्मीरमध्ये आयटीबीपीच्या जवानांच्या बसला भीषण अपघात, ६ जवान शहिद

जम्मू : १६ ऑगस्ट – जम्मू-काश्मीरमध्ये चंदनवाडीत आयटीबीपीच्या जवानांची बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूण ३९ जवान प्रवास करत होते. या अपघातात आयटीबीपीचे ६ जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात ३२ जवान जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघात एवढा भीषण होता की यात ६ आयटीबीपीच्या जवानांचा मृत्यू झाला आहे.

३९ जवानांपैकी ३७ आयटीबीपीचे तर २ जम्मू-काश्मीर पोलिसांचे असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या बसमध्ये जवान प्रवास करत होते ती सिव्हिल बस होती आणि अचानक ब्रेक निकामी झाल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळली.
हे जवान चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने जात होते. पहलगामच्या फ्रिसलानमध्ये ही बस नदीत पडली आहे. अमरनाथ यात्रेसाठी या भागाच्या सुरक्षेसाठी जवान तैनात करण्यात आले होते. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी चंदनवाडीहून ही बस पहलगामच्या दिशेने येत होती. अपघात एवढा मोठा होता की बस चंदनवाडी येथे सुमारे २०० फूट खाली दरीत कोसळसली. त्यानंतर या बसचा स्फोट झाला.

Leave a Reply