विदर्भात सर्वदूर पाऊस, पूर्ण विदर्भालाच कुठे रेड तर कुठे ऑरेंज अलर्ट

नागपूर : १० ऑगस्ट – बुधवारी (दि. १०) दिवसभर विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर गोंदिया, भंडारा, वर्धा, अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असून गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, अकोला जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुक्यामध्ये अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस कोसळू शकतो. तसेच बुलडाणा, वाशीम जिल्ह्याच्याही अनेक भागात मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील ज्या तालुक्यांना अतिवृष्टीचा धोका आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील पुरजन्य परिस्थिती काही ओसरताना दिसून येत नाही. काही दिवस पावसाने उसंत घेतल्यावर पुन्हा पुरजन्य स्थिती निर्माण होत आहे. मागील तीन दिवसांच्या संततधार पावसामुळे तिसऱ्यांदा जिल्ह्याला पुराचा फटका बसला आहे. यामुळे अनेक मुख्य मार्ग बंद झाले असून अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. तेलंगणा राज्य महामार्ग बंद झाला आहे, तर चंद्रपूरचा गडचिरोली जिल्ह्याशी संबंध तुटला आहे.
मोहाडीत पुराच्या पाण्यात कार गेली वाहून
भंडाऱ्याच्या मोहाडीत पुराच्या पाण्यात कार गेल्याची धक्कादायक घटना घडलीयं. वेळीच लोकांची मदत मिळाल्याने कार सहित 2 लोकांचे वाचले प्राण आहेत. नसीब बलवत्तर होते म्हणून कार मधील दोन्ही लोक बचावले आहेत. मात्र, कार पाण्यात वाहून जातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोयं.
नागपूरच्या विहीरगावातील नागरिकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले
नागपूर शेजारी विहीरगाव परिसरात पुराचं पाणी शिरलंय. यामुळे रात्रीपासून 50 पेक्षा जास्त नागरीक अडकले असून यांचं रेस्क्यू ॲापरेशन राबवणं गरजेचं आहे. याच पुराच्या पाण्यात तीन गाई अडकल्या असल्याची माहिती देखील मिळते आहे.
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मोरणा नदीवरील पुलाचे दोन्ही बाजूचे सरंक्षक कठडे तुटल्याने वाहतूकीसाठी हा पुल धोकादायक ठरत आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मोरणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुलाच्या मधोमध पडलया खड्ड्यात पाणी साचले आहे. अरुंद असलेल्या या पुलावर दोन्ही बाजूने सरंक्षककडे नसल्याने रात्री बेरात्री पुलावरून वाहन जातांना मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गोंदिया जिल्ह्यात मुसळदार पावसाने घरात शिरले पाणी
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अलर्टनुसार गोंदिया जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित केला आहे. जिल्ह्यात कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. इतकेच नाही तर रस्त्यांवरही गुडघाभर पाणी साचल्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. मुसळदार पावसाने नदी नाले ओसंडून वाहत आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजारमधील पूर्णा मध्यम प्रकल्पाचे 9 दरवाजे उघडले.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजारमधील पूर्णा मध्यम प्रकल्पाचे 9 दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे पुर्णा नदीला मोठा पुर आलायं. पिंपरी थुगाव ते शिरजगाव कसब्याला जोडनाऱ्या पुलावरून वाहू लागल्याने संपूर्ण वाहतूक ही बंद करण्यात आलीयं. पूर्णा नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलायं.
त्यामध्ये प्रामुख्याने चामोर्शी, गडचिरोली, वडसा, कुरखेडा, कोरची, देसाईगंज, आरमोरी, धानोरा, गोंदिया, तिरोडा, आमगाव, गोरेगाव, भंडारा, तुमसर, लाखणी, लाखांदुर, मुल, सावली, लाखणी, लाखांदुर, नागपूर रामटेक, पारशिवणी, मौदा, ऊमरेड, सावनेर, नरखेड, कामठी, पाचगाव, धामणा, कुही, भिवापूर, वरुड, मोर्शी, चांदुरबाजार, अचलपूर, धारणी, चिखलदरा, तिवसा, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, दर्यापूर, अकोट, तेल्हारा, बाळापूर, अकोला, मूर्तिजापूर, जळगाव जामोद, शेगाव, मेहकर, कारंजा, मंगरुळपीर, नेरपरसोपंत, बाभुळगाव, यवतमाळ या तालुक्यांचा समावेश आहे.

Leave a Reply