ओंजळीतील फुलं – महेश उपदेव

अल्प सहवास लाभलेले सवंगडी

28 dec mahesh updeo final

रेशिमबाग म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय, स्मृती मंदिर यामुळे जग प्रसिद्ध आहे. रेशिमबाग च्या प्लॉट क्रमाक ४ मध्ये भौबे यांचे निवास स्थान ५ मध्ये पेंडके यांचे तर प्लॉट क्रमांक ६ मध्ये सिर्सीकर यांचे निवास स्थान आहे, घराला लागून घर आहे . माझे छोटे काका प्रमोद उपदेव मधुकर पैडके यांचे घरी किरायाने राहायचे यामुळे माझे शालेय जीवनातील एक दोन वर्षाच्या काळात मी काकांन कडे राहायचो. त्यामुळे माझी दिपक सिर्सीकर, बाळ पेंडके , मनिष भोंबे यांच्या शी परिचय झाला , तो काळ १९७६-७७ होता, मैत्रीत रूपांतर झाले, दिपक व मी बरोबर चा होतो, बाळ व मनिष आमच्या पेक्षा खूप लहान होते, उन्हाळ्यात पेंडके किंवा सिर्सीकर यांच्या घरी आम्ही खेळत असू, दिपक सिरसीकर उत्कृष्ठ बुद्धी बळ पटू होता त्यामुळे मला व माझा आते भाऊ श्रीकांत झाडगांवकर याला ही बुद्धीबळाचे वेढ लागले होते अनेक स्पर्धेत आम्ही भाग घेतला, त्यानंतर मी मात्र बास्केट बॉल कडे वळलो. तेथून ताटातूट झाली.
सर्वजण आपआपल्या क्षेत्रात निष्णांत झाले, दिपक वकील झाला मी पत्रकार झालो, बाळ पेंडके एम आर झाला, मनिष खासगी नोकरी करू लागला.
अंदाजे १९९२ च्या काळात भर तारुण्यात दिपक सिर्सीकर चा हृदय विकाराने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली मला एकदम शॉक बसला, त्याची पत्नी भारती माझी मैत्रिन आहे. एवढा तरुण मित्र गेल्याचे मला खूप दुःख झाले, तर २०१४ च्या सुमारास बाळ पेंडके याचा ४९ व्या वर्षी हृदय विकाराने मृत्यू झाला, काल अचानक एक धक्का बसला मनिष भोंबे यांचा५२ व्या वर्षी मृत्यू झाल्याची माहिती माझे काका प्रमोद उपदेव यांनी मला दिली, त्याचा थोडा धक्का बसला, भोंबे परिवाराशी माझे कौटुबिक नाते असल्यामुळे मला हे दुःख पचवणे थोडे जड गेले.
कारण या तिघांचे वय बघता इतक्या लवकर आपले सवंगडी आपल्याला हे सोडून जातील असे वाटले नाही. नियती समोर काहीच चालत नाही, उतरत्या क्रमात म्हणजे प्लॉट क्रमांक ६,५,४ या प्रमाणे हे मित्र स्वर्गवासी झाले. मनिष ने मित्र संग्रह खूप मोठा तयार केल्या होता, तो फेसबुक चा बाबा झाला होता, त्याच्या परिचीत लोकोना वाढदिवसाच्या शुभेच्छा न विसरता द्यायचा मनिष च्या पोस्ट मुळे आज कोणाचा वाढ दिवस आहे हे कळायचे, तो सर्वाचा लाडका होता. मनिष तू मात्र लवकरच सोडून गेला.

भावपूर्ण श्रद्धाजंली

महेश उपदेव

Leave a Reply