अकोल्यात दिव्यांगांकडून ११ हजार राख्यांची निर्मिती

अकोला : ७ ऑगस्ट – शिक्षणासोबत रोजगार मिळण्याच्या दृष्टीने दिव्यांगांकडून ११ हजार राख्यांची निर्मिती करण्यात आली आहे. दिव्यांग सोशल फाउंडेशनच्यावतीने विशेष उपक्रम राबविण्यात आला.
दिव्यांग सोशल फाउंडेशनकडून प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांगांसाठी चार दिवसीय राखी निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेमध्ये दिव्यांगांनी राख्या तयार केल्या. त्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी त्या राख्यांची विविध शाळा, महाविद्यालय व बाजारपेठेत दालन लावून विक्री केली जाणार आहे.
शिवाजी महाविद्यालयातील दिव्यांग कक्षात राख्याची विक्री केली जाईल. ऑनलाइन पद्धतीने सुद्धा या राख्या भारताच्या विविध शहरात पाठवल्या जात आहेत. या राख्यांच्या विक्रीतून मिळणारा निधी दिव्यांग शिक्षणासाठी उपयोगात आणला जाणार आहे. विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिकांनी या उपक्रमाला प्रतिसाद देण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या उपक्रमात निर्मिती करण्यात आलेल्या राख्या विदेशात देखील पाठविण्यात आल्या आहेत. या राख्यांना चांगली मागणी असल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले. दिव्यांगांनी अत्यंत आकर्षक राख्या तयार केल्या आहेत.

Leave a Reply