संपादकीय संवाद – नव्या उपराष्ट्रपतींचे अभिनंदन

भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांची निवड झाली आहे, त्यांनी विरोधी आघाडीच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा ३४६ मतांनी दणदणीत पराभव केला. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोघांचीही जबाबदारी देशाचा कारभार घटनेच्या चौकटीत चालतो किंवा नाही, हे बघण्याची असते. राष्ट्रपतींच्या गैरहजरीत उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींचे कार्यलयही सांभाळत असतात, त्याशिवाय राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणूनही त्यांना काम सांभाळावे लागते. राज्यसभा हे ज्येष्ठांचे सभागृह म्हणून ओळखले जाते, याठिकाणी सभागृहाचा अध्यक्ष हा कायद्याने चालणाराच असणे गरजेचे असते, जगदीप धनखड हे देखील कायद्याने चालणारे कडक शिस्तीचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात, या आधी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते, त्या ठिकाणी ममता बॅनर्जींसारख्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांनी चांगलेच अडचणीत आणले होते, कायद्याबाबत कोणतीही तडजोड तिथे ते करत नव्हते. त्यामुळे ममतादीदी प्रचंड त्रस्त होत्या. आता धनखड बंगालमधून दिल्लीत आले आहेत. त्यामुळे ममता दीदींनी सुटकेचा श्वास सोडला असू शकतो.
आपल्या देशात आज द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्या आहेत, त्याचवेळी धनखड हे उपराष्ट्रपती झाले आहेत, हे दोघेही देशाला एक नवी दिशा देतील यात कोणाच्याही मनात शंका नाही, या निमित्ताने पुन्हा एकदा उप्राष्ट्रपतींचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा …

अविनाश पाठक

Leave a Reply