अनेक आव्हाने पायदळी तुडवत आम्ही भगवा रोवला आहे – उद्धव ठाकरे

मुंबई : ३ ऑगस्ट – शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत असा पुनरुच्चार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर जळगावच्या शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या विधानावर बोट ठेवलं. जे पी नड्डा यांनी शिवसेना संपण्याच्या मार्गावर असल्याचं विधान केलं आहे. राजकारणात विजय आणि पराभव होत असतो, पण आता संपवण्याची भाषा केली जात आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. अनेक आव्हानं पायदळी तुडवत आम्ही झेंडा रोवला आहे असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
“दोन ते तीन पातळीवर आपली लढाई सुरु आहे. रस्त्यावरील लढाईत आपण काही कमी पडणार नाही. कोर्टातही सुनावणी सुरु आहे. तिसऱी लढाई म्हणजे शपथपत्र आणि सदस्य नोंदणी आहे. विषय गंभीर असून अर्ध्यात सोडू नका,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं. न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
“आजपर्यंत अनेकदा शिवसेना फोडण्याचे प्रयत्न झाले, पण आता संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत,” असं सांगत उद्धव ठाकरेंनी जे पी नड्डा यांच्या वक्तव्यावर टीका केली. बंड याआधीही झाले असून मी त्यांना सामोरं गेलो आहे. हे बंड थंड करण्याची ताकद माझ्याकडे आहे. पण आता राजकारणात तुम्हाला मुळापासून संपवण्याचा डाव आखला जात आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Reply