गदिमांचा अंगठा – सुमित्र श्रीधर माडगूळकर

गदिमांच्या महानिर्वाणानंतर त्यांच्या काही अस्थि आमच्या नकळत कोणी जपून ठेऊ शकेल?,पण असे घडले होते.. आपण ज्याची कल्पना पण करू शकत नाही अशा काही गोष्टी जगात घडत असतात….

“पंचवटी”,पुणे अर्थात गदिमांच्या बंगल्यात नातेवाईक व गदिमांच्या चाहत्यांचा स्नेहमेळा जमला होता,कारण तसेच होते आज ‘लोकमान्य टिळक प्रतिष्ठान’ व ‘पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती समिती’ मार्फत गदिमांच्या वास्तूवर निलफलक लावण्यात येणार होता.या खाजगी संस्थेमार्फत पुण्यातील नामवंतांच्या घरावर असे निलफलक लावण्यात येतात.

ना.सं.इनामदार,म.श्री.दीक्षितांसारखे अनेक नामवंत उपस्थित होते,कार्यक्रम छान पार पडला,सुंदर भाषणे झाली… गदिमांच्या अनेक आठवणी रंगल्या होत्या … वातावरण ‘गदिमा’मय झाले होते. एक अनोळखी गृहस्थ मात्र तिथेच घुटमळत होते,त्यांना काहीतरी बोलायचे होते असे वाटत होते,दरवर्षी होणाऱ्या १४ डिसेंबरच्या ‘गदिमा पुरस्कार’ सोहळ्यात दिसणाऱ्या ओळखीच्या चेहऱ्यापैकी त्यांचा चेहरा नक्कीच नव्हता. शेवटी ते आम्हाला भेटले व म्हणाले…

“मी अमूक तमूक…….तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे..पण हिंमत होत नाहीये…..”.त्यांचा चेहरा खूपच गंभीर वाटला.

सद्गृहस्थ सांगू लागले …..”१५-१६ डिसेंबर १९७७ ची गोष्ट आहे,आमच्या एका नातेवाईकाचे अचानक निधन झाले,त्यामूळे वैकुंठ स्मशानभूमित जावे लागले,तिकडे एका ठिकाणी हारांचा मोठाच्या मोठा ढिग पडला होता…मला वाटले कोणीतरी मोठी व्यक्ति नक्कीच गेली असणार,मी चौकशी केली तर कर्मचारी म्हणाले ‘अरे तुम्हाला माहित नाही काल १४ तारखेला गदिमा गेले’….”

खरे म्हणजे १४ डिसेंबर १९७७ म्हणजे आम्हा माडगूळकर कुटुंबियांसाठी आनंदाचा दिवस ठरला असता,ग.दि.माडगूळकर व व्यकंटेश माडगूळकर या दोन थोर साहित्यिकांच्या जन्मदेचा त्या दिवशी आदर्श माता पुरस्काराने सन्मान होणार होता,गदिमा स्वतः उपस्थित राहणार होते,पण दैवदुर्विलास असा की एकीकडे गदिमांची आई आदर्श माता पुरस्कार स्विकारत होती व इकडे पंचवटीमध्ये गदिमांची प्राणज्योत मालवली .. सगळेच अतर्क्य….

सद्गृहस्थ पुढे सांगू लागले… मला याची काहीच कल्पना नव्हती आणि मी पुण्याच्या बाहेर होतो,मला खुप हळहळ वाटली….गदिमांचे अंतिम दर्शन मी घेऊ शकलो नाही निदान त्यांच्या अस्थिचे दर्शन तरी घ्यावे म्हणून त्या हारांच्या ढिगार्‍या जवळ गेलो.एका महाकवीची ती चिता होती,चितेचे मी मनोभावे दर्शन घेतले व परत फिरणार तोच माझे लक्ष्य त्यांच्या अस्थिंकडे गेले व माझे अंग शहारुन गेले…राखेत त्यांचा उजव्या हाताचा अंगठा पडला होता,तो उजव्या हाताचा अगंठा मी बरोबर ओळखला…

एकदम गदिमांची गाणी..कविता..चित्रपट….गीतरामायण माझ्या डोळ्यासमोरुन तरळून गेले…..

हाच तो अंगठा ज्याने अनेक गाणी…चित्रपट…कविता लिहिल्या ….

“नाच रे मोरा…..” सारखे आपले बालपण सामावणारे बालगीत लिहिले
“इंद्रायणी काठी देवाची आळंदी……” सारखा अभंग लिहिला…
“बुगडी माझी सांडली ग……..” सारखी लावणी लिहिली…
“दैवजात दुखे: भरता दोष ना कुणाचा….” सारखे आयुष्याचे सत्य लिहिले….

हे सर्व लिहिणारा हाच तो गदिमांचा अंगठा माझ्या समोर पडला होता,एका महाकविचा अंगठा,ज्याने आपल्याला आयुष्यभर नुसता भरभरून आनंद दिला…ते सांगत होते “मी क्षणभर स्तब्ध झालो.. कोणी आपल्याकडे बघत नाही ना याची खात्री करुन गदिमांचा तो अंगठा ऊचलला….”.

“देवांना देव्हार्‍यात जपावे तसा हा अंगठा मी वर्षानूवर्ष जपला….तो टिकावा म्हणून एक विशिष्ठ प्रकारचे केमीकल लागते व ते सतत बदलावे ही लागते,ते खास परदेशाहून आणत होतो,योग्य वेळी बदलत होतो…”

“पण एकदा सलग वर्षभर मला परदेशी जावे लागले व परत आलो तर तो अंगठा खराब झाला होता,त्याची माती झाली होती ….”

“या गोष्टीची सल अनेक वर्ष माझ्या मनात होती…आज हिंमत करुन तुम्हांला सांगितली…मी तुमचा अपराधी आहे,पण यामागे गदिमांबद्दल माझे अफाट प्रेम हेच एकमेव कारण होते.”

गोष्ट संपली होती,त्यानंतर ना ते एक शब्द बोलू शकले ना आम्ही…एखाद्याच्या अस्थि चोरणे म्हणजे अक्षम्य गुन्हा..पण या चाहत्याबद्दल आम्ही निशब्द होतो.एखाद्या भक्ताने आपल्या सदगुरुंच्या पादुका जपाव्यात कदाचीत तितक्याच सदभावनेने हे कृत्य झाले असावे,गदिमा जितके आमचे होते तितकेच ते त्यांचेही होते…प्रत्येक मराठी माणसाचे होते…

“आपल्या मनात जिथे पवित्र व सुंदर गोष्टी वास करतात तिथे गदिमांचे स्थान आहे…”

“चंदनी चितेत जळाला चंदन…
सुगंधे भरुन मर्त्यलोक…”

समाजमाध्यमावरुन साभार….

Leave a Reply