शमशेरा धडाम से गिरा!
RRR, KGF नंतर “शमशेरा” बघितला. शमशेरा बघताना पहिल्या अर्धा तासात कळले की पैसे वाया गेले. आज सकाळी वृत्तवाहिन्या सांगताहेत की चित्रपटाने आतापर्यंत फक्त दहा कोटीचा धंदा केला तर बॉक्स ऑफिस च्या भाषेत “चित्रपट आपटला”.
RRR चे कथानक ब्रिटिश राजवटीतील – ब्रिटिश राजवटी विरोधात बंड. तोच् गाभारा ठेवत “शमशेरा” बनविला. मात्र दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूडचे चित्रपट दोघांची तुलना करता येवू शकत नाही.
तसे बघितले तर दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते आणि बॉलिवूडचे अभिनेते दोन्ही ठिकाणी घराणेशाही. घराण्यात कोणी तरी नामांकित अभिनेता बनतो आणि पुढे त्यांची मुले बापाचा, आईचा मक्ता पुढे चालवतात. आणि आम्हा बॉलिवूड सिनेमे बघणाऱ्यांना तरी ते खपवून घ्यावे लागते. आणि पुढे पुढे आम्हाला मग सवय पडते त्यांचे चित्रपट बघणे अंगवळणी जेपडते. कारण आम्हाला दुसरा चॉईस नसतो. अशा प्रकारे आपण आपली प्रेक्षक म्हणून चोखंदळ प्रेक्षक ह्या वृत्तीला लगाम लावत असतो. दिसेल तेच् चाकोरीबद्ध बघत असतो.
हीच् बाब मात्र दाक्षिणात्य चित्रपट बघताना (हिंदी भाषा असणारे) मात्र चित्रपट बनविणाऱ्यांची प्रगल्भता, त्यांचे चित्रपटाचे सेट अति भव्य दिव्य – बाहुबली बघा. त्यांचे सेट, युद्धाची आयुधे, असामान्य परिस्थितीत हिरोचे परिस्थितीवर मात करण्याचे कसब – चित्रीकरणातून वाटते की हो ! शक्य आहे. आणि जिथे शक्य नाही तिथे RRR मध्ये पाय तुटलेला राम चरण एकदम रामाच्या भुमिकेत बाण चालवताना हातात धनुष्य घेतलेला, कटी पितांबर नेसलेला – ब्रिटिश सैन्याबरोबर जंगलात लढताना दाखविला. सामान्य परिस्थितीमध्ये हे शक्य नाही पण चित्रीकरणाची जादू समजा, संगीताची लय समजा अथवा रामाप्रती श्रद्धा समजा. त्या चार सेकंदामध्ये हा सीन दाद घेऊन जातो. थिएटरमध्ये त्या घटकेला टाळ्या पडतात. मग सिनेमा संपल्यावर जेव्हा आपण परतताना विचार करतो की यार आपण ह्या सीनला दाद दिली पण हे शक्य आहे का? तर उत्तर मिळते, नाही! हे शक्य नाही! थोडक्यात प्रेक्षकांना त्या घडीला “बेवकुफ” बनविण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला.
अमिताभ बच्चन ने एक किस्सा सांगितला १९८२, सिनेमा “देशप्रेमी” गाणे “खातुन की खिदमत मे सलाम अपुनका” ! हेमामालिनी अमिताभ बच्चनला ओळखत असते. पण हेमामालिनीची परिक्षा घ्यायला वेष बदलून अमिताभ बच्चन येतो आणि हे गाणे म्हणतो. तर वेष बदलतो म्हणजे अमिताभ बच्चन काय करतो तर फक्त गालावर एक मोठा “मस्सावजा तिळ” लावतो. आणि तरी ही हेमामालिनी त्याला ओळखत नाही. त्यावेळी अमिताभ बच्चन ने अशा प्रकारे शुटिंग च्या पहिले मनमोहन देसाई ना आपला आक्षेप नोंदवला होता. त्याच्या म्हणण्यानुसार आपण प्रेक्षकांना बेवकुफ समजतोय. प्रेक्षक तितका बेवकुफ नाही. पण मनमोहन देसाई नी आक्षेप फेटाळून लावला. म्हणाले “अरे! हे गाणे प्रेक्षकात कमाल करेल आणि पिक्चर मध्ये धमाल करेल”! आणि झाले पण तसेच्. हैद्राबादी लहेज्यातील ह्या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर शेवटी अमिताभ बच्चन म्हणाला हेच् कारण आहे की मी अभिनेता आहे तर मनमोहन देसाई दिग्दर्शक. जनतेला काय रूचेल हे दिग्दर्शक चांगले ओळखून असतो तर कोणत्या भुमिकेत कोण फिट्ट बसेल हे दिग्दर्शक चांगले जोखून बसवतो. अभिनयातील कसब आणि उंच शरीरयष्टी ची देणगी सोबत भरल्या घोगऱ्या आवाजातील डायलॉग डिलीव्हरी ची फेक आणि ह्या सर्वांचा संगम म्हणजे अमिताभ बच्चन. आज ही करोडो जनतेच्या हृदयावर राज्य करतोय. क्वचित सिनेमात तर कधी कधी “कौन बनेगा करोडपती” मध्ये येवून आजसुद्धा कैक करोड लोकांचा चाहता आहे. कारण “हिरो” म्हटल्यावर जनतेला “उंच शरीरयष्टी” असणारा अभिनेता आवडतो. प्रभास, राम चरण, यश ही सगळी मंडळी बघा उंच शरीरयष्टी ची आहेत आणि लोकांनी ह्यांना डोक्यावर उचलले आहे. ही हिरो मंडळी आज बॉलिवूड वर राज्य करताहेत आणि बॉलिवूडच्या हिरोंना साईडरोल देऊन त्यांची औकात दाखवीत आहेत.
आमचे बॉलीवूड हिरोंची शरीरयष्टी उंची बघा – शाहरुख खान १.६९ मीटर, अमीर खान १.६३ मीटर, सलमान खान रनबीर कपूर १.८३ मीटर, ह्रितीक रोशन १.८ मीटर, अमिताभ बच्चन १.८८ मीटर , अक्षय कुमार १.७८ मीटर, सलमान खान १.७४ मीटर
तर दाक्षिणात्य प्रभास १.८८ मीटर, यश १.८ मीटर, राम चरन १.७४ मीटर
तुलनात्मक दृष्ट्या बघा आमची बॉलिवूड मंडळी का घसरली. अनेक कारणातील हे एक कारण. प्रथम दर्शनी उंच नायक अभिनेताच् प्रेक्षक पसंद करतात.
हिरो म्हटला की उंचापुरा, धष्टपुष्ट, कणखर आवाजाचा, कॅरेक्टर मध्ये घुसलेला अभिनय आणि कृतीने चपळ एवढे मिळाले की प्रेक्षकांमध्ये हिरो ची छबी कायम कोरली जाते. आजच्या घडीला दाक्षिणात्य अभिनेते बॉलिवूड प्रेक्षकांवर राज्य करताहेत. जसा बाहुबली मध्ये १.८८ मीटर प्रभास ने बाजी मारली, प्रेक्षकांना भावून गेला तसा अमिताभ बच्चन १.८८ मीटरचा बॉलिवूड चा अनिषिभिक्त सम्राट आहे. १.६९ मीटरी शाहरुख खानने त्याची जागा घ्यायचा खुप प्रयत्न केला. “डॉन” चे तीन भाग काढून सुद्धा अमिताभ बच्चन ची उंची शाहरुख खान गाठू शकला नाही. “कौन बनेगा करोडपती” अमिताभ बच्चन ची जागा घेतली आणि ह्याने समोरच्याना हॉट सीटवर बसवून, स्वतः चा पिछवाडा जाळून घेतलेला. ही खान गॅंग म्हणजे बॉलिवूड मधली घाण. ह्यांचे सिनेमे सदैव “अलिमौला अलिमौला” करणारे. हिंदू देवीदेवतांची टर उडविणारे. हिंदू धर्माला कमी लेखणारे पण गंमत म्हणजे हिंदू प्रेक्षकांकडून हजारो कोटींचा गल्ला भरणारे. तर दाक्षिणात्य चित्रपट आज सुद्धा हिंदू देवी देवतांना मान सन्मान देणारे दाखवितात. आणि इथेच् बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये खूप मोठा फरक आहे. “शमशेरा” मध्ये दाक्षिणात्य चित्रपटांची कॉपी करून चित्रिकरण करण्याचे कसब घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र सालाबादाप्रमाणे “हिंदू कॅरॅक्टर शुद्ध सिंग” संजय दत्तला आडवे भस्म आणि उभा लाल तिलक लावून परत एकदा खलनायक म्हणून उभा केला.
असे म्हणतात की बॉलिवूड दावुद च्या पैशांवर चालतो तर पुर्वी डॉन मंडळींकडून पैसा यायचा. वर परत बोलताना फवारा जावेद अख्तर सारखे मुसलमान लेखक ह्या मुसलमान भुमिका रेखाटायचे. त्यामुळे सिनेमात मुसलमान चांगला नी हिंदू वाईट दाखवितात. मग “जंजीर” मधला “यारी है इमान मेरा” वाला पठाण का बच्चा प्राण घ्या! दीवार मधील 786 चा अमिताभ बच्चन चा रक्षणकर्ता बिल्ला घ्या! शोले मधला ए.के. हंगल घ्या. ते आजतागायत बॉलिवूड चित्रपटात मुसलमान लोकांना चारित्र्यवान दाखविले जाते. हा एक प्रायोजित अजेंडा आहे, नाळ तुटलेल्या हिंदू जनांना कायमचे हिंदू संस्कृती पासून दूर करण्याचा. आणि हिंदू जनांची नाळ ढिली करून त्यांच्या मनात मुसलमानांप्रती आदर निर्माण करण्याचा. प्रत्यक्षात जर बघाल तर गुन्हेगारी जगतात नव्वद टक्क्याचे वर ही शांतीदूत मंडळी असतात तर आतंकवादी नावं शंभर टक्के शांतीदूत असतात. पण बॉलिवूड चित्रपटात ही मंडळी चारित्र्यसंपन्न दाखवितात. वास्तव आणि बॉलिवूड चित्रपटांमधील तफावत लोकांच्या लक्षात आली. आता सोशल मिडिया मुळे बॉलिवूड मंडळी, हिरो सगळे रसातळाला गेले. पण दाक्षिणात्य चित्रपट मात्र आजही हिंदू देवी देवतांना पुज्य स्थानी ठेवून संस्कारीत चित्रपट काढतात. जे की एक वास्तव आहे. आणि हेच् मुख्य कारण आहे की बॉलिवूड चित्रपटांनी आपल्या हिंदू संस्कारांची नाळ तोडली आणि चित्रपटात त्याला हास्याचा विषय ठरविला तर दाक्षिणात्य चित्रपटांची भव्यता, उत्कृष्ट अभिनेत्यांची निवड, दैदिप्यमान सेट्स, हिंदू देवीदेवतांशी जोडलेली नाळ आणि चित्रीकरणाचे कौशल्य. ह्यामुळे बॉलिवूड चा प्रेक्षक दाक्षिणात्य चित्रपटांचा फॅन झाला. कोरोनाचा मार आणि दाक्षिणात्य चित्रपटांनी केलेली बॉलिवूड ची पडझड ह्यातून सावरायला “शमशेरा” काढला पण त्यात संजय दत्त ला जी हिंदू भस्म कुंकू लावून खलनायक बनविले आणि प्रेक्षकांनी ह्या चित्रपटाकडे पाठ फिरवली. RRR मध्ये न वाचवू शकणाऱ्या परिस्थिती मध्ये राम चरणला प्रभू रामाच्या वेषात बाण मारताना बघून प्रेक्षक टाळ्या पिटतात, त्याप्रमाणे शमशेरा मध्ये अचानक कावळ्यांचा मोठा थवा येवून शमशेराच्या विरोधकांवर हल्ला चढविताना दिसतात. अतर्क्य आहे. आणि शमशेरा ला वाचवितात. ह्या फाईट चे चित्रीकरण अतिशय सुमार दर्जाचे आहे. कुठे कुठे जाणवते की हे नकली कावळे ड्रोन पद्धतीने कंट्रोल करताहेत. पाठी मध्ये लाकडाचा तुकडा घुसला असताना, तो काढल्यावर देखील ज्या पद्धतीने रणबीर कपूर शुद्ध सिंग शी फाईट करतो. तिथे वैद्यकीय शास्त्र तोकडे पडते. अशा चुका बॉलिवूड मध्ये खुप साऱ्या चित्रपटात आढळतात.
एकंदर काय संपुर्ण थिएटर मध्ये आम्ही आठ जण होतो. तिघेजण पहिल्या अर्ध्या तासात उठून पळाले तर आम्ही पाच जण आपापली सहनशीलता वाढविण्याचा प्रयत्न करीत होतो.
सुमार कथानक, टपोरी चित्रीकरण (#कावळाथवा), हिंदू द्वेष्टा दृष्टिकोन ह्यापायी हा चित्रपट न बघितलेला बरा. पाच पैकी गुण द्यायचे असल्यास अर्धा गुण पुष्कळ झाला. तो देखील रणबीर कपूर च्या नृत्य कौशल्यासाठी.
आपण प्रेक्षक म्हणून मनाशी खूणगाठ बांधा की जो पर्यंत बॉलिवूड हिंदू देवी देवतांचा मान सन्मान सुस्थापित करीत नाही, तोपर्यंत बॉलिवूड चित्रपट बघायचा नाही.
जो पर्यंत चित्रपटात चोर, आतंकवाद्यांची नावे शांतीदूत नावांशी, वास्तवाशी मेळ खात नाहीत तोपर्यंत बॉलिवूड चित्रपट बघायचा नाही.
जो पर्यंत घराणेशाही चालू आहे, नवीन कलाकार एकत्र येवून बॉलिवूड अभिनय प्रगल्भ होवून चोखंदळ प्रेक्षकांना सिमीत कक्षेतून मुक्त करीत नाही तोपर्यंत बॉलिवूड चित्रपट बघायचा नाही.
भाई देवघरे