“माझे गाव-माझी शाखा” उपक्रमाच्या आणखी एका शाखेचे उद्टघान

नागपूर : २४ जुलै – नागपूर शहर अंतर्गत उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील मॉडेल टाऊन शाखेचे इंदोरा चौक येथे आज शनिवार (दि. २३) “माझे गाव-माझी शाखा” उपक्रमाच्या आणखी एका शाखेचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
याप्रसंगी बॊलताना कुणाल राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व विधानसभा क्षेत्रात जास्तीत जास्त शाखा निर्माण करून युवकांना जोडण्याचा तसेच
त्या-त्या शाखेतील परिसरातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा. युवा कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. दरम्यान प्रदेश अध्यक्षांनी दिलेली जवाबदारी आपण योग्य पद्धतीने पार पाडू अशी ग्वाही यावेळी नवनिर्वाचित शाखा पदाधिकाऱ्यांनी दिली. प्रास्ताविक निशाद इंदूरकर यांनी केले तर आभार बाबू खान यांनी मानले.
यावेळी कार्यक्रमाला युवक काँग्रेस प्रदेश महासचिव असिफ शेख, प्रदेश महासचिव पंकज सावरकर, दुर्गेश पांडे, सतीश पाली, असद खान, गौतम अंबादे, विधानसभा अध्यक्ष निलेश खोब्रागडे, शहर उपाध्यक्ष शिलज पांडे, सचिन वासनिक, चेतन तरारे, निशाद इंदूरकर, बाबू खान, कुणाल निमगडे, राकेश इखार, शाखा अध्यक्ष अधिकांश हिरेखन, शाखा उपाध्यक्ष रजत खोब्रागडे, महासचिव आशिष साखरे, रुपिल वाहने, पालाश कोचे, सुमित सहारे, सचिव रजत बागडे, संकल्प भागवतकर, रोहित निकोसे आदी उपस्थित होते.

Leave a Reply