पतीने बांधकाम ठेकेदाराशी मैत्री तोडण्याचे सांगितल्याने महिलेने केली आत्महत्या

नागपूर : २२ जुलै – बांधकाम ठेकेदाराशी मैत्री करणे एका महिलेच्या जीवावर बेतले. ठेकेदाराशी मैत्री पतीने तोडण्यास सांगितल्यामुळे महिलेने आत्महत्या केली. संगीता संतराम उईके (३२, बहुजननगर, झेंडा चौक, एमआयडीसी) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतराम आणि संगीता हे दोघेही मध्यप्रदेशातील शिवनीतील रहिवासी आहेत. ते कामाच्या शोधात नागपुरात आले. त्यांना १३ वर्षांची मुलगी आणि ८ वर्षांचा मुलगा आहे. संतराम हा बांधकाम मिस्त्री आहे तर संगीता ही बांधकामावर मजुरीचे काम करते. काही महिन्यांपूर्वी संतराम हा प्रीतम नावाच्या ठेकेदाराकडे काम करायला लागला. त्यामुळे त्याचे घरी येणे जाणे होते.
प्रीतम महिलांना मजुरांशी गैरप्रकार करीत होता. त्यामुळे संतरामने प्रीतमकडील काम सोडून दिले. मात्र, काही दिवसानंतर प्रीतमने संगीताला आपल्या बांधकामावर बोलावले. संगीता त्याच्यासोबत कामावर जाऊ लागली. काही दिवसानंतर ही बाब पतीला समजली. त्याने प्रीतम योग्य माणूस नाही,त्यांच्याशी मैत्री तोंड असे सतरामने पत्नीला सांगितले.या मुद्यावरून पती- पत्नीत वाद सुरू झाले. त्यामुळे संगिताने कामावर जाणे बंद केले. मात्र गेल्या १८ आणि १९ जुलैला ती पुन्हा ठेकेदाराकडे कामाला गेली. पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला.. त्यामुळे संगीताने २० जुलैला रात्री अकरा वाजता आत्महत्या केली.

Leave a Reply